Agriculture news in Marathi Peas in the city, improvement in the price of okra; Onion market stable | Agrowon

नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा; कांदा बाजार स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

आठ दिवसांत वाटाणा, भेंडी दरात सुधारणा झाली. येथे दर दिवसाला वाटाण्याची १५ ते १७ क्विंटलची आवक झाली व प्रतिक्विंटल ४ ते ६ हजार रुपयाचा दर मिळाला. तर भेंडीची १३ ते १४ क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजार रुपये दर मिळाला.

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांत वाटाणा, भेंडी दरात सुधारणा झाली. येथे दर दिवसाला वाटाण्याची १५ ते १७ क्विंटलची आवक झाली व प्रतिक्विंटल ४ ते ६ हजार रुपयाचा दर मिळाला. तर भेंडीची १३ ते १४ क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजार रुपये दर मिळाला. येथे दर दिवसाला साधारण १२०० ते  १२५० क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे. कांद्याचे दर आठवडाभरापासून स्थिर आहेत, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला, भुसार व कांद्याची आवकही चांगली होत आहे. येथे टोमॅटोची २०० ते २०३ क्विंटलची आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १ हजार रुपये दर मिळाला. वांगीची ६० ते ६५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ३ हजार, फ्लॉवरची १०० क्विंटलची आवक होऊन१ हजार ते अडीच हजार रुपये दर मिळाला. 

काकडीची १४४ ते १५० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार रुपये, गवारची २२ ते २५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार ५००, घोसाळ्याची २ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ५००, दोडक्याची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ ते ३ हजाराचा दर मिळाला. कारल्याची २५ ते २७ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजाराचा दर मिळाला. वाल ची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. घेवड्याची ४ ते ५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजार, बटाट्याची २९० ते ३०० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजाराचा दर मिळाला. हिरवी मिरचीची ४५ तेत ५० क्विंटलची आवक होऊन ३ ते ३ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला.

कांदा दर स्थिर
नगर बाजार समितीसह पारनेर, घोडेगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याचे दर गेल्या आठवड्यात १५०० पासून २००० ते २१०० रुपयांपर्यंत स्थिर राहिले, व सरासरी १२०० ते १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. नगर बाजार समितीत ५० ते ६० हजार गोण्याची प्रत्येक लिलावाला आवक झाली. दोन नंबरच्या कांद्याला १००० ते १५००, तीन नंबरच्या कांद्याला ६०० ते १ हजार व चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ६०० रुपयांपर्यंत दर स्थिर होता.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात कांदा ३०० ते ३५०० रुपये क्विंटलसोलापुरात क्विंटलला १००० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-...
नगर येथे टोमॅटो, घेवडा दरात सुधारणानाशिक नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी बाजार...
बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२१)...
राज्यात भेंडी ६०० ते ४५०० रुपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला २५०० ते ३००० रुपये...
सोलापुरात वांग्यांच्या, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगर बाजार समितीत भाजीपाला आवक स्थिरनगरः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मक्याला हमी दराच्या आतच दरऔरंगाबाद : येथील कृषी बाजार समितीमध्ये मक्याची...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या दरात तेजी;आवक...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात लिंबे २५० ते २६०० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ८०० ते १२०० रुपये अकोला ः...
नगरमध्ये टोमॅटो, वांगी, कारल्याला अधिक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात गवार, भेंडी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत सोयाबीन ५७५० रुपयांवरनागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीन दरात घसरण...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
केळी दरांवर दबाव वाढताचजळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव वाढतच आहे....
सोयाबीनच्या दरात वाशीममध्ये सुधारणावाशीम : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये डाळिंबाचा दर मागणीमुळे टिकूननाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्यांची मागणी, दर स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कांदा २०० ते ४५०० रुपये क्विंटलजळगावात क्विंटलला १४०० ते २४०० रुपये ...