परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल दर

Peas getting Rs 4000 to Rs 6000 per quintal in Parbhani
Peas getting Rs 4000 to Rs 6000 per quintal in Parbhani

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील वाटाण्याची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. २२) वाटाण्याची २० क्विंटल आवक होती. वाटाण्याला प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ७ क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक झाली असताना प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला २०० ते ४५० रुपये रुपये दर मिळाले. वांग्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कोबीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले.लिंबांची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com