Agriculture news in Marathi Peasant movement with black ribbons | Page 2 ||| Agrowon

काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहनानुसार शुक्रवारी (ता. १८) राज्यात शेतकरी पारतंत्र्य दिन पाळण्यात आल्याची माहिती किसान पुत्र आंदोलनच्या वतीने देण्यात आली.

आंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहनानुसार शुक्रवारी (ता. १८) राज्यात शेतकरी पारतंत्र्य दिन पाळण्यात आल्याची माहिती किसान पुत्र आंदोलनच्या वतीने देण्यात आली.

१८ जून १९५१ रोजी पहिली घटनादुरुस्ती करून परिशिष्ट-९ची निर्मिती करण्यात आली. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे नरभक्षी कायदे या परिशिष्टात टाकलेले आहेत. या कायद्यांमुळे सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या आहेत. आज परिशिष्ट ९ मध्ये २८४ कायदे आहेत त्या पैकी २५० कायदे शेती व शेतकऱ्यांशी थेट संबंधित आहेत. किसानपूत्र आंदोलन पहिल्या घटनादुरुस्तीचा निषेध करण्यासाठी दरवर्षी १८ जूनला शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळते.कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा दिवस किसानपुत्रांनी वैयक्तिक पाळावा, असे ठरले होते. तरीही अनेक कल्पक किसानपुत्रांनी स्थानिक स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम केले. काळी फीत लावणे, घरावर व वाहनावर काळी पताका लावणे आदी कार्यक्रम किसानपुत्रांनी केले.

किसानपुत्र जागा झाला ः अमर हबीब
महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी पारतंत्र्य दिवस किसानपुत्रांनी पाळला. त्यांची संख्या आणि उत्साह पाहता किसानपुत्र जागा झाला आहे असे ठामपणे म्हणता येईल, असे मत किसानपुत्र आंदोलनचे अमर हबीब यांनी व्यक्त केले.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...