agriculture news in marathi The peasant movement swayed the egoistic power reacts farmer leaders | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांच्या आंदोलनाने अहंकारी सत्तेला झुकविले, मात्र...

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाने देशातील अहंकारी सत्तेला झुकायला लावले, हे आंदोलन इतिहासाला नोंद घेणारे ठरले,

पुणे : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाने देशातील अहंकारी सत्तेला झुकायला लावले, हे आंदोलन इतिहासाला नोंद घेणारे ठरले, मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळाले नाही, असे मत राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले.

गेल्या वर्षभरापासून दिल्लीत देशातील प्रमुख ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनास आज (ता. २६) वर्षपूर्ती होत आहे. या आंदोलनाबात बोलताना राज्यातील शेतकरी नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. 

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘देशात गेल्या २५-३० वर्षांत अनेक आंदोलने झाली. यामध्ये, नामांतर, राम मंदिर, मराठा, धनगर आरक्षण यांचा समावेश होता. या विविध आंदोलनाप्रमाणेच दिल्लीच्या सीमेवर वर्षभर चाललेले शेतकऱ्यांचे आंदोलन इतिहासाला नोंद घेणार ठरले. मात्र या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडल नाही ही शोकांतिका आहे. जे कायदे केवळ कागदावर होते. जे कायदे अस्तित्वातच आले नाहीत ते कायदे मागे घेण्यासाठी केलेल हे आंदोलन अनाठायी होत. गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या गळ्या भोवतीच्या फाशीचा दोर तयार झालेले कायदे रद्द करण्याबाबत या आंदोलनात ब्र शब्द देखील काढला नाही. त्यामुळे अनाठायी झालेले आंदोलन होते.’ 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, ‘‘ज्यांना कोणीच जाब विचारू शकत नाही. अशा अहंकारी सत्तेला झुकायला लावणार हे आंदोलन होते. सर्वसामान्य जनता अहंकाराचा पराभव कसा करू शकते. हा संदेश दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने दिला आहे. या आंदोलनाची दखल इतिसाहासाला घ्यावी लागणार आहे.’’ 

  केवळ निवडणुकांमुळे निर्णय...
‘‘दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र शेतकऱ्यांना हवे होते ते यातून काहीच मिळालेले नाही. आंदोलनादरम्यान किमान आधारभूत किंमत कायदा, वीजबिल माफी आणि धानाचा तूस जाळल्यानंतर होणाऱ्या फौजदारी कारवाईचा कायदा मागे घ्यावा, या तीन मुद्द्यांवर मोदींनी भाष्यच केले नाही. त्यामुळे मोदींनी ज्याप्रमाणे कायदे आणले आणि मागे घेतले. हे कायदे मागे न घेतल्यास पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये आपला फज्जा उडेल या भीतीने हे कायदे मागे घेतले आहेत. आंदोलनातून शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही,’’ असे मत शेतकरी संघटनेचे पाईक आणि शेती प्रश्‍नांचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. 


इतर अॅग्रो विशेष
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....