‘जलयुक्त'ची कामे न केल्यास दंडात्मक कारवाई

‘जलयुक्त'ची कामे न केल्यास दंडात्मक कारवाई
‘जलयुक्त'ची कामे न केल्यास दंडात्मक कारवाई

नगर : यंदा जिल्ह्यातील जलयुक्‍त शिवार अभियानासाठी २४९ गावांची निवड झाली. यात सुरू असलेल्या कामांची संख्या सहा हजार ३८२ आहे. त्यांपैकी दोन हजार ४४३ कामे पूर्ण झाली असून, संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांची संख्या सहा हजार ४०९ आहे. ही कामे ३१ मेअखेर पूर्ण करावीत, अन्यथा ज्या ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण केले नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.  

द्विवेदी म्हणाले, ‘जलयुक्त''ची ४६ कोटी ४६ लाख रुपयांची दोन हजार ४४३ कामे पूर्ण झाली आहेत. १३३ कोटी ६१ लाख रुपये खर्चाची सहा हजार ३८२ कामे प्रगतिपथावर आहेत. २०१५-१६ या पहिल्या वर्षात ‘जलयुक्त''मध्ये जिल्ह्यातील २७९ गावांची निवड झाली. त्यानंतर २०१६-१७ मध्ये २६८, तर २०१७-१८ या तिसऱ्या वर्षात २४१ गावांची निवड झाली. २०१८-१९ साठी जिल्ह्यातील २४९ गावांचा समावेश ‘जलयुक्त''मध्ये झाला. 

या अभियानाला पहिल्या वर्षापासूनच स्थानिक नागरिकांसह स्वयंसेवी संघटना व संस्थांचा मोठा सहयोग मिळाला. यंदा २४९ गावांत १८७ कोटी ८१ लाख रुपये खर्चाची सहा हजार ४३९ कामे प्रस्तावित आहेत. त्यांपैकी सहा हजार ४३५ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यतादेखील मिळाली. तीन हजार ९५९ कामांची निविदा कार्यवाही पूर्ण झाली आहे. पावसाळ्याआधी जलयुक्तची कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे जलयुक्तची कामे तातडीने करा. त्यात कुचराई झाली, तर कारवाई केली जाईल.

तालुकानिहाय सुरू कामे  नगर - ११०७, पारनेर - ३१५, पाथर्डी - ८७१, कर्जत - १२४७, श्रीगोंदे - २८१, श्रीरामपूर - ५१, राहुरी - २३६, नेवासे - ८७, शेवगाव - २५७, संगमनेर - २९२, अकोले - १४४३, कोपरगाव - ६६, राहाता - १२९.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com