agriculture news in marathi, penalty to fodder camp owners, nagar, maharashtra | Agrowon

नगरमधील १३६ छावणीचालकांना ४४ लाख रुपयांचा दंड

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 एप्रिल 2019

नगर  : दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, छावण्यांमध्ये जनावरांना पुरेशी सुविधा न देणाऱ्या छावणीचालकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्हाभरातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही अजून अनेक छावण्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी येतच आहेत.

नगर  : दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, छावण्यांमध्ये जनावरांना पुरेशी सुविधा न देणाऱ्या छावणीचालकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्हाभरातील १३६ छावणीचालकांना ४४ लाख ३७ हजार रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे. मात्र, तरीही अजून अनेक छावण्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी येतच आहेत.

जिल्ह्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे दुष्काळी स्थिती आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. या भागात शेती पूर्णतः तोटयात गेलेली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांची जनावरे जगावी, यासाठी प्रशासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यांमध्ये प्रशासकीय नियमानुसार सुविधा देणे गरजेचे आहे. यामध्ये छावणीचालक टाळाटाळ करतात. विशेषतः आठवड्यात तीन दिवस एक दिवसाआड पशुखाद्य देणे बंधनकारक असताना ते दिले जात नसल्याच्या सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी छावणी तपासणीसाठी ३२ पथकांची नियुक्ती केली. यात आत्तापर्यंत सुमारे १३६ जनावरांच्या छावण्यांमध्ये अनियमितता असल्याचे आढळून आले आहे.

अनेक छावण्यांमध्ये पशुखाद्य दिले जात नसल्याची बाब समोर आल्यानंतर तपासणी पथकाने संबंधित छावण्यांवर कारवाई करून आत्तापर्यंत ४४ लाख १५६० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांची हेळसांड सुरूच
जनावरांच्या छावण्यांमध्ये पशुखाद्य व अन्य सुविधा दिल्या जात नसल्यामुळे प्रशासन कारवाई करत असले तरी अनेक ठिकाणी छावणीचालकांकडून शेतकऱ्यांची हेळसांड सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येत आहेत. प्रशासन सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असून, नंतर तक्रारींची दखल घेतली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...