मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी शेतकऱ्यांचे मन
बातम्या
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा कोटीच्या दंडाची नोटीस
नगर ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या. मात्र, या छावण्यांत बेशिस्त कारभार होत असल्याचे छावण्यांच्या तपासणी अहवालातून समोर आले. त्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कर्जत तालुक्यातील १२ छावण्यांना एक कोटी २३ लाखांचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावल्या. छावणीचालकांना त्यावर ४८ तासांत खुलासा करायचा आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.

जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे जनावरे जगवण्यासाठी अजूनही चारा छावण्या सुरू आहेत. मात्र छावण्या चालवताना आवश्यक त्या सुविधा देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने जिल्हा प्रशासन छावणी चालकांवर कारवाई करत आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात ५११ चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. जूनपर्यंत यापैकी ५०४ चारा छावण्या सुरू होत्या. त्यात दाखल असलेल्या पशुधनाची संख्या साडेतीन लाखांपर्यंत पोचली होती.
दरम्यान, जूनपासून मागील दोन महिन्यांच्या अवधीत जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे चारा छावण्यांची संख्या घटली. सध्या जिल्ह्यात १११ चारा छावण्या सुरू असून, त्यात दाखल असलेल्या पशुधनाची संख्या ६२ हजार २३० आहे. रजिस्टर अद्ययावत नसणे, चारावाटप न करणे, जनावरांच्या कानाला बिल्ले न लावणे आदी त्रुटींसाठी दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. छावणी चालकांना दंड केला जात असल्याने चालक धस्तावले आहेत.
- 1 of 912
- ››