सोलापुरात थकीत एफआरपीचा दर मंगळवारी होणार आढावा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील ३३६ कोटी रुपयांच्या थकीत एफआरपीपैकी ५१ टक्के एफआरपी वसूल झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पण अद्यापही आठ कारखान्यांकडे बाकी आहेच, त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी लावलेल्या रेट्यामुळे प्रशासनाने आता एफआरपीची रक्कम तत्काळ मिळावी, यासाठी दर मंगळवारी आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एफआरपीच्या वसुलीचे काम पाहणाऱ्या नायब तहसीलदारांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्ह्यातील एफआरपीच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. गोकूळ शुगरकडे थकीत असलेल्या ४२ कोटी रुपयांपैकी ३२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. जयहिंद कारखान्याकडे असलेल्या २० कोटी रुपयांपैकी १४ कोटी ४२ लाख रुपयांचे वाटप झाले आहे. केवड येथील बबनराव शिंदे शुगरकडे थकीत असलेल्या ५५ कोटी ७२ लाख रुपयांपैकी किती रकमेचे वाटप झाले आहे, याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. तर विठ्ठल रिफायनरीकडे थकीत असलेल्या ४२ कोटी १५ लाख रुपयांचे वाटप सुरू असल्याचा अहवाल या बैठकीत देण्यात आला.  

कुर्मदास साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या १४ कोटी १९ लाख रुपयांच्या वसुलीसाठी आरआरसी कारवाई करून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. सिद्धेश्‍वर साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ३९ कोटी ४० लाख रुपयांपैकी किती रकमेचे वाटप झाले आहे याची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली नाही. मकाई साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या १२ कोटी १८ लाख रुपयांच्याबाबतीत प्रक्रिया सुरू असल्याचे तेथील नायब तहसीलदारांनी बैठकीत सांगितले. विठ्ठल कार्पोरेशनकडे थकीत असलेल्या ६८ कोटी रुपयांपैकी ४५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. फॅबटेक शुगरकडे असलेल्या ४२ कोटी रुपयांपैकी २६ कोटी ५१ लाख रुपयांचे वाटप झाले असल्याची माहिती देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com