Agriculture news in Marathi The pending issue of Devna storage lake is finally resolved | Page 3 ||| Agrowon

देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागासाठी जीवनदायी असलेला आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या योजनेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागासाठी जीवनदायी असलेला आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या योजनेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  

देवनाचा साठवण तलावाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित योजनेस मंगळवारी (ता. १९) मृद्‌ व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे येवल्यातील उत्तरपूर्व भागातील पाणी प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

येवला तालुक्यातील खरवंडी व देवदरी या गावाजवळील मन्याड नदीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर देवनाचा साठवण बंधाऱ्याचे काम प्रस्तावित आहे. तापी खोऱ्याच्या बृहत आराखड्यात हा प्रकल्प भविष्यकालीन प्रकल्प म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी नियोजन व जलविज्ञान कार्यालय, नाशिकचे मुख्य अभियंता यांचे २० जानेवारी २०१४च्या पत्रानुसार १.८५ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे. प्रस्तावित धरण संरेखेपासून १८ चौ.किमी पाणलोट क्षेत्र आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याकडून योजनेच्या मातीधरणाचे काटछेदाचे संकल्पन करण्यात आलेले आहे. तसेच एसएलटीएसी कडून या प्रस्तावित प्रकल्पाची छाननी झालेली असून या प्रकल्पासाठी रक्कम १२.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे.

असा होणार फायदा
येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ही योजना आहे. तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु.या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे.

या भागात जानेवारी उजाडले की पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर वाढते. शेती अडचणीत असल्याने अनेकांनी गाव सोडले आहे. ही मान्यता मिळाल्याने आता मोठा दिलासा मिळाला आहे. या भागात शेतीसह पूरक उद्योगांना चालना मिळेल.
- भागवतराव सोनवणे, अध्यक्ष-देवनाचा प्रकल्प कृती समिती.

असा आहे देवनाचा प्रकल्प

  • जमिनीचे संपादनक्षेत्र - ५७ हेक्टर (वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर; त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र तर १.२५ हेक्टर क्षेत्र खासगी)
  • मातीच्या धरणाची लांबी - २२५ मीटर  
  • धरणाची उंची -१६.१८ मीटर
  • सांडव्याची लांबी - ९० मीटर
  • परिसरात पाणी उपलब्ध - २.८ दशलक्ष घनमीटर  
  • साठवण तलावात पाणी साठवणूक - १.८५  दशलक्ष घनमीटर
  • प्रकल्पाची सिंचन क्षमता - ३५८ हेक्टर

 


इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची काढणी प्रत्येक भाजीपाला पिकाचा काढणी कालावधी हा...
पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात...सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७...
अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा...अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक...
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या...
कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः...नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची...
खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घटजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा...मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९...
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी...निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना...
खानदेशात ऊसगाळप राहणार मार्चअखेरपर्यंत...जळगाव ः  खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप...
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन,...कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी...
शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवारनाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी...
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष...नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात...
सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार...सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत...
मराठीला अभिजात दर्जा मिळविणारच :...मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला,...
खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी...
किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया...जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के...
नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना...नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम...
सोसायट्यांच्या वसुलीपूर्वी प्रोत्साहन...सातारा : आता मार्च महिन्यात सोसायट्यांची...
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास...
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...