agriculture news in marathi, pending sugar will pressure next sugar season | Page 2 ||| Agrowon

शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?
राजकुमार चौगुले
सोमवार, 25 मार्च 2019

कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा सिस्टीमचा दणका देशातील कारखान्यांना बसला आहे. फेब्रुवारीचाच कोटा शिल्लक असताना पुन्हा मार्चमध्येही तो वाढवून देण्यात आला आहे. यामुळे कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे कोणीही इकडे लक्ष देण्यास उत्सुक नसल्याने कारखानदारांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांची उर्वरित देणी देण्यावर होणार आहे. 

कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा सिस्टीमचा दणका देशातील कारखान्यांना बसला आहे. फेब्रुवारीचाच कोटा शिल्लक असताना पुन्हा मार्चमध्येही तो वाढवून देण्यात आला आहे. यामुळे कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे कोणीही इकडे लक्ष देण्यास उत्सुक नसल्याने कारखानदारांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांची उर्वरित देणी देण्यावर होणार आहे. 

कोणत्या कारखान्याने किती साखर कोणत्या महिन्यात विकावी यासाठी केंद्राने कोटा सिस्टीम सुरू केली. यानुसार साखरेची विक्री करण्याचे नियोजन कारखान्यांना घालून दिले. केंद्राने किमान साखर विक्रीची किंमत वाढविली खरी, पण यानंतर साखरेचा कोटाही वाढवून दिला. फेब्रुवारीचा देशातील एकूण कोटा २१.५० लाख टन होता. मागणी नसल्याने ही साखर विकताना कारखान्यांना नाकी नऊ आले. यातील केवळ तीस टक्क्‍यांपर्यंत साखर विकली गेली.

फेब्रुवारीची साखर विकली न गेल्याने अडचणीत आलेल्या कारखान्यांना मार्चची साखर विकण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले. यातच केंद्राने मार्चचा कोटा ३ लाख टनाने वाढवत तो २४.५ लाख टन इतका केला आहे. आता ही साखर विकायची कधी, असा प्रश्‍न कारखानदारांना पडला आहे. दर वाढविल्याचा फायदा कारखान्यांना होऊन ते जास्तीत जास्त साखर विक्री करतील असा कयास होता. परंतु व्यापाऱ्यांनी मागणी फारशी न केल्याने दर वाढीचा हा निर्णय कारखान्यांचा ‘बुमरॅंग’ झाल्यासारखा वाटत आहे. दर वाढले पण मागणी घटली असे चित्र आहे. 

पुढील हंगाम दबावात सुरू होणार 
यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असताना साखर शिल्लक रहाण्याची शक्‍यता आहे. यंदाचे वाढलेले उत्पादन व विक्रीबाबतचा धीमेपणा याचा एकत्रीत परिणाम म्हणून २०१९-२० चा गळीत हंगाम या साखरेच्या दबावाखाली सुरू होऊ शकतो असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. पुढील हंगामात यंदाच्या हंगामातील तब्बल १२५ लाख टन साखर स्टॉकच्या दबावात पुढील हंगाम सुरू होऊ शकतो. यामुळे पुढील हंगामात साखर विक्रीचे गणित घालताना कारखानदारांची मोठीच कसरत होणार हे निश्‍चित. 

१८ लाख टन उत्पादनात वाढ
यंदा देशातील ५२७ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. १५ मार्चअखेर २७३.४७ लाख टन साखर उत्पादन झाले. १५ मार्चअखेर १५४ कारखान्यांनी गाळप थांबविले. सध्या देशातील ३७३ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. गेल्या वर्षी १५ मार्चअखेर २५८ लाख टन साखर उत्पादित झाली होती. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकातील हंगाम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रात या कालावधीपर्यंत गेल्यावर्षीच्या तुलतेत सात लाख मेट्रिक टनांनी उत्पादन वाढले आहे. सध्या १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अद्याप ११० कारखाने सुरू आहेत. 

उत्तर प्रदेशात ११६ कारखाने सुरू आहेत. गेल्या वर्षी या कालावधी पर्यंत ८४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. यंदाही यात अद्याप पर्यत तरी फारशी वाढ नाही. कर्नाटकात आतापर्यत ४२ लाख टन साखरेची निर्मिती झाली. गेल्या वर्षी 
याच कालावधीत ती ३७ लाख टन होती. तामिळनाडूत ५.४० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधी पर्यत ते ४.४० लाख टन इतके होते. इतर राज्यातूनही काही प्रमाणात साखरेचे उत्पादन वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

निर्यातीची चालढकल भोवतेय?
केंद्राने कच्ची साखर निर्यात करण्यासाठी अनुदान दिले होते. काही चाणाक्ष कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीला, मध्याला तसेच हंगामाच्या शेवटीही काही प्रमाणात कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. याला सरकार अनुदान देणार असल्याने अनेक कारखान्यांनी याबाबत सकारात्मका दाखविली. पण देशातील बहुतांशी कारखान्यांनी याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी साखर दर व कमी मागणीच्या चक्रव्यूहातून अनेक कारखाने अद्याप बाहेर पडले नसल्याचे साखर तज्ज्ञांनी सांगितले. आता इथेनॉलकडे वळण्याशिवाय पर्याय नसल्याचा सूर कारखानदारांकडून व्यक्त होत असला तरी यंदाच्या हंगामातील साखरेचे व शेतकऱ्यांच्या देणी भागविण्याच्या प्रश्‍नाचे काय करायचे हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीतच आहे. 

कमी किंमतीने साखर विक्री करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा इशारा
सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीने साखर विक्रीचे प्रकार आढळून येत असल्याने या कारखान्यांवर कारवाई करणचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा उपसचिव जितेंद्र जोयल यांनी दिले आहेत. यामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील काही कारखान्यांनी कमी किंमतीत साखर विक्री केल्याच्या आलेल्या तक्रारीनंतर केंद्राने हे पाऊल उचलल्याने कारखानदारांची अडचण झाली आहे. २८ मार्चला राज्यातील कारखान्यांची बैठक साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बोलाविली आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...
शासनाने दूध अनुदानाचे २५० कोटी थकविलेपुणे : राज्याच्या एका भागात चारा-पाणीटंचाई तर...
पूर व्यवस्थापन प्रकल्पात महाराष्ट्र...पुणे : केंद्र शासनाकडून देशात सुरू असलेल्या...
शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती...मुंबई: शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या...
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गाळाने...कोल्हापूर/सांगली : बारमाही नद्यांनी दक्षिण...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाजपुणे : पाऊस थांबल्याने राज्याच्या अनेक भागांतील...