agriculture news in marathi, peon looted 22 lakhs from farmers for scheme benefit | Agrowon

शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला गंडा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील जनावरे वाटप योजनेचा लाभ मिळवून देण्याची बतावणी करीत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शिपायाने १४ शेतकऱ्यांना २२ लाखांचा गंडा घातला. फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. 

आष्टी शहीद तालुक्‍याच्या पार्डी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नंदकिशोर गुरनुले हा शिपाई आहे. त्याने शासकीय योजनेतून ७५ टक्‍क्‍के अनुदानावर जनावरे मिळवून देण्याची बतावणी शेतकऱ्यांना केली. शेतकऱ्यांनी त्याच्या बोलवण्यावर विश्‍वास ठेवत त्याने सांगितलेले दस्तऐवज आणून दिले.

वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील जनावरे वाटप योजनेचा लाभ मिळवून देण्याची बतावणी करीत पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शिपायाने १४ शेतकऱ्यांना २२ लाखांचा गंडा घातला. फसवणूक करण्यात आल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. 

आष्टी शहीद तालुक्‍याच्या पार्डी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नंदकिशोर गुरनुले हा शिपाई आहे. त्याने शासकीय योजनेतून ७५ टक्‍क्‍के अनुदानावर जनावरे मिळवून देण्याची बतावणी शेतकऱ्यांना केली. शेतकऱ्यांनी त्याच्या बोलवण्यावर विश्‍वास ठेवत त्याने सांगितलेले दस्तऐवज आणून दिले.

शासनाकडून ६ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मिळेल याची हमी दिल्यावर ८ लाखांच्या योजनेमधील १ लाख ५० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. पैशाची जुळवाजुळव करून ते नंदकिशोर याला दिल्यावर त्यांनी पावती फाडली. मूळ कॉपी सोबत घेऊन गेला. झेरॉक्‍स देतो म्हणून सांगत होता. परंतु पावती दिलीच नाही. तो सर्व शेतकऱ्यांना मी डॉक्‍टर आहे, अशी बतावणी करीत होता. त्यामुळे एकापाठोपाठ एका  शेतकऱ्याने पैसे भरले. नंतर तो डॉक्‍टर नसून शिपाई असल्याचा खुलासा झाल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. याप्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिस तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे शिपाई नंदकिशोर गुरुनुले याच्यावर यापूर्वी देखील अशाप्रकारच्या फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. निलंबनानंतर अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्याची हिंमत वाढल्याचे सांगीतले जाते. याप्रकरणी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा गुल्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 
अनुदान होते खात्यात जमा

गायी, म्हैस अनुदानावर देण्याची पशुसंवर्धन खात्याची योजना आहे. त्याकरिता ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचे आहेत. अनुदानदेखील खात्यात जमा होते. त्याकरिता असलेल्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत.

या शेतकऱ्यांची झाली फसवणूक :  गजानन अडसड  (रा. साहूर), दामोदर पांडे (रा. सत्तरपूर), रामदास ठाकरे (रा. धाडी), साहेबराव चोरे (रा. धाडी), मुकर ठाकरे (रा), पापडकर (रा. धाडी), अनिल काळे (रा. वर्धपूर), गोवर्धन पोटे (रा. सलरपूर), किशोर पापडकर (रा. धाडी), अरुण अडसड (रा. साहूर), सागर रत्नपारखी (रा. साहूर).

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...