लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः मुख्यमंत्री फडणवीस

लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः मुख्यमंत्री फडणवीस
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः मुख्यमंत्री फडणवीस

नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली तेव्हा लोकांशी मुजोरी केली. आता तरी त्यांनी नीट राहावे. किमान विरोधी पक्ष होण्यासाठी तरी प्रतिनिधी निवडून येतील, नाही तर परिस्थिती अवघड होईल. पवार, मुंडे, सुळे पुढील चाळीस वर्ष विरोधी बाकावर असतील, असे सांगत लोकांच्या आशीर्वादामुळेच लोकसभेत काँगेसला चारीमुंड्या चित करू शकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मधुकर पिचड भाजपात आल्याने आमची मोठी ताकद वाढली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी (ता. १३) नगर जिल्ह्यामधील अकोले येथून सुरवात झाली. अकोले येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश केल्यावर खऱ्या अर्थाने भाजपला बळ मिळाले. त्यामुळे आमची ताकद वाढली आहे. आता एकीकडे आम्ही व दुसरीकडे लोकांचे बळ, त्यामुळे वैभव पिचड पुन्हा मोठ्या मताने निवडून येतील. अकोल्यात आले की आम्हाला शिवरायांची प्रेरणा मिळते. येथे आदिवासी समाजाची संस्कृती आहे. येथील शेकतरी कष्ट करणारा आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. जनता हेच आमचे दैवत आहे. ’’

या वेळी माजीमंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार वैभव पिचड, सुजितसिंग ठाकूर, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, हेमलता पिचड, जिल्हा बॅंक अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषद भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न  मुख्यमंत्र्यांचा ताफा अकोले येथील सभास्थळाकडे चालला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेश उपाध्यक्षा शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाई दुसऱ्याच गाडीवर पडली. महापोर्टल बंद करण्याची मागणी असून पिचड यांना उमेदवारी न देण्याबाबत त्यांनी मागणी केली. त्‍यानंतर येवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com