Agriculture news in Marathi, People with behave politely : Chief Minister Fadnavis | Page 2 ||| Agrowon

लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः मुख्यमंत्री फडणवीस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली तेव्हा लोकांशी मुजोरी केली. आता तरी त्यांनी नीट राहावे. किमान विरोधी पक्ष होण्यासाठी तरी प्रतिनिधी निवडून येतील, नाही तर परिस्थिती अवघड होईल. पवार, मुंडे, सुळे पुढील चाळीस वर्ष विरोधी बाकावर असतील, असे सांगत लोकांच्या आशीर्वादामुळेच लोकसभेत काँगेसला चारीमुंड्या चित करू शकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मधुकर पिचड भाजपात आल्याने आमची मोठी ताकद वाढली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली तेव्हा लोकांशी मुजोरी केली. आता तरी त्यांनी नीट राहावे. किमान विरोधी पक्ष होण्यासाठी तरी प्रतिनिधी निवडून येतील, नाही तर परिस्थिती अवघड होईल. पवार, मुंडे, सुळे पुढील चाळीस वर्ष विरोधी बाकावर असतील, असे सांगत लोकांच्या आशीर्वादामुळेच लोकसभेत काँगेसला चारीमुंड्या चित करू शकलो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मधुकर पिचड भाजपात आल्याने आमची मोठी ताकद वाढली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी (ता. १३) नगर जिल्ह्यामधील अकोले येथून सुरवात झाली. अकोले येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माजी मंत्री मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश केल्यावर खऱ्या अर्थाने भाजपला बळ मिळाले. त्यामुळे आमची ताकद वाढली आहे. आता एकीकडे आम्ही व दुसरीकडे लोकांचे बळ, त्यामुळे वैभव पिचड पुन्हा मोठ्या मताने निवडून येतील. अकोल्यात आले की आम्हाला शिवरायांची प्रेरणा मिळते. येथे आदिवासी समाजाची संस्कृती आहे. येथील शेकतरी कष्ट करणारा आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. जनता हेच आमचे दैवत आहे. ’’

या वेळी माजीमंत्री मधुकर पिचड, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार वैभव पिचड, सुजितसिंग ठाकूर, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, हेमलता पिचड, जिल्हा बॅंक अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषद भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित होते.

ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न 
मुख्यमंत्र्यांचा ताफा अकोले येथील सभास्थळाकडे चालला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेश उपाध्यक्षा शर्मिला येवले यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाई दुसऱ्याच गाडीवर पडली. महापोर्टल बंद करण्याची मागणी असून पिचड यांना उमेदवारी न देण्याबाबत त्यांनी मागणी केली. त्‍यानंतर येवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...