agriculture news in Marathi, People do not have water, where to bring them to the animals? | Agrowon

माणसांना पाणी नाही, तिथं जनावरांसाठी आणावं कुठून? : शेतकऱ्यांची पत्रकार परिषद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मार्च 2019

औरंगाबाद ः ना विहिरीला पाणी, ना चारा अशा गंभीर स्थितीत पशुधन कसे जगवावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिथं माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तिथं जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी आणावं तरी कुठून, असा सवाल पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी केला. विहिरींची खालावत चाललेली स्थिती तर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई प्रत्यक्ष स्थिती दाखवत शासनाने तातडीने चारा छावणी सुरू करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. 

औरंगाबाद ः ना विहिरीला पाणी, ना चारा अशा गंभीर स्थितीत पशुधन कसे जगवावे, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. जिथं माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तिथं जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे पाणी आणावं तरी कुठून, असा सवाल पळशी शहर (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी केला. विहिरींची खालावत चाललेली स्थिती तर जनावरांच्या चाऱ्याची टंचाई प्रत्यक्ष स्थिती दाखवत शासनाने तातडीने चारा छावणी सुरू करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. 

आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण दुष्काळ यंदा असल्याचं स्पष्ट करणाऱ्या पळशीच्या शेतकऱ्यांनी याविषयीची प्रत्यक्ष माहिती देण्यासाठी पळशी येथे शुक्रवारी (ता. ८) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांना गावशिवारातील चारा, पाणी व जनावरांच्या स्थितीची माहिती दिली. विहिरी कोरड्या पडल्या असून पाऊसच झाला नसल्याने शेततळी रिकामी आहेत. 

ओसाड पडलेल्या माळरानावर जनावरांना चरण्यासाठी गवताची काडी नाही. खरीप हातचा गेल्याने त्यावर असलेली जनावरांच्या चाऱ्याची आशा धुळीस मिळाली. दुसरीकडे अल्प झालेला पाऊस व पुरेशी ओल नसल्याने रब्बीकडूनही चाऱ्याची फारशी आशा नाही. आता बाहेरुन कडबा विकत आणावा तर त्यांच्या किंमती तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति शेकडा झाल्या. खर्च पेलणारा नसल्याने अशा स्थितीत जनावरे कशी जगावायची हा प्रश्न आहे. पशुधन जगले पाहिजे. त्यांचा आम्ही मुलांप्रमाणे सांभाळ करतो. मात्र जनावरांचे खपाटीला गेलेले पोट बघवत नाही. 

शेतातून काहीच हाती लागले नाही. आता कामेसुद्धा शिल्लक नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न सुद्धा रखडत आहे. शेतकऱ्यांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चारा छावणी सुरू करणे आवश्‍यक असल्याचे मतं त्यांनी व्यक्त केली. या वेळी नानासाहेब पळसकर, संतोष काजळे, सुभाष लहाने, बाबासाहेब पळसकर, कचरू पळसकर, संजय पळसकर, राजेंद्र पळसकर, मन्सूर शहा, सोमीनाथ पळसकर, आसाराम शेळके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली होती. आता लेखी स्वरुपात मागणी करणार आहोत. पुढील तीन महिने अतिशय संकटाची असल्याने जनावरांना चाराच सोडा पाणीसुद्धा मिळणे अवघड होईल अशी स्थिती आहे. 
- नानासाहेब पळसकर, 
शेतकरी, पळशी, ता. औरंगाबाद.

इतर अॅग्रो विशेष
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...