agriculture news in Marathi people migrated from flood area Maharashtra | Page 3 ||| Agrowon

सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यातच कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यातच कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा आणि कृष्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले असून नदीकाठच्या गावांत शिरले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. 

वाळवा तालुक्यासह मिरज तालुक्यात कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावातील लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. तर सांगली शहरातील कापडपेठ, शिवाजी मंडई, गणपतीपेठ या भागांतील दुकानातील साहित्याची बांधाबांध करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची धांदल सुरू आहे. जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले असून, दुसरे पथक रात्रीपर्यंत येणार आहे. 

जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा या तालुक्यांत संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली असून, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. प्रशासनाने गुरुवारपासून पूरपट्ट्यातील गावांना पुराचा इशारा दिला होता. त्यामुळे काही प्रमाणात लोकांनी वाळवा तालुक्यात गुरुवारी (ता. २२) रात्रीपासून कुटुंबांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली असून, जनावरेदेखील सुरक्षित स्थळी घेऊन जाऊ लागले आहेत. सांगली शहरातील लोकांनी सकाळपासून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. 

कोयना आणि चांदोली धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते आहे. आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या नदीची पाणीपातळी दुपारी दोनपर्यंत ४३ फुटांपर्यंत पोहोचली आहे. पाण्याचा विसर्ग असाच राहिला, तर आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी ५० ते ५२ फूट इतकी होईल. दरम्यान, पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्क करून विसर्ग वाढण्याबाबत समन्वय करत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असेही सांगण्यात येत आहे. 

बाजारात शिरले पाणी
सांगली शहरातील गणपतीपेठ, कापडपेठ, मारुती रोड या परिसरांत विविध दुकाने आहेत. २०१९ मध्ये या दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. यंदाही पूरपरिस्थिती निर्माम झाली आहे. त्यामुळे दुकान मालकांनी दुकानातील साहित्य भरण्याचे काम सकाळपासून सुरू केले आहे. रस्त्यावर वाहतूक करणारे ट्रक, टेम्पोमध्ये साहित्य भरून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी धांदल सुरू आहे. रस्त्यावर हमाल, दुकानमालक यांची साहित्य भरण्यासाठी गर्दी झाली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...