Agriculture news in marathi; People will give us choice again in the coming elections: Chief Minister Fadnavis | Agrowon

येत्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हाला पसंती देईल ः मुख्यमंत्री फडणवीस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कोल्हापूर ः सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या समोर जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हाला पसंती देईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

कोल्हापूर ः सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या समोर जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हाला पसंती देईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

विधानसभेच्या तोंडावर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या महाजनादेश यात्रेचे मंगळवारी (ता. १७) शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सकाळी अकरा वाजता या यात्रेला ताराराणी चौकातील हॉटेल पंचशीलच्या दारातून सुरवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरून ही यात्रा कळंबामार्गे राधानगरी तालुक्‍यात रवाना झाली. या महाजनादेशच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात झाली. सोमवारी रात्री इचलकरंजीहून श्री. फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेल्या यात्रेचे ताराराणी चौकात आगमन झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी श्री. फडणवीस हे विमानाने औरंगाबादला गेले. तेथून साडेदहाच्या सुमारास त्यांचे पुन्हा कोल्हापुरातील हॉटेल पंचशील येथे आगमन झाले. अकराच्या सुमारास ढोल, ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांकडून होणारा जयघोष अशा वातावरणात हवेत भगवे-हिरवे फुगे सोडून या यात्रेची सुरवात कोल्हापुरात झाली.

या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत रथात पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. रस्त्याच्या दुतर्फा उभारलेल्या नागरीकांनी या यात्रेचे स्वागत केले. या नागरिकांना श्री. फडणवीस यांनी अभिवादन केले.

इतर बातम्या
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...