agriculture news in Marathi peoples checking will be by pulse oximeter Maharashtra | Agrowon

पल्स ऑक्सीमीटरद्वारे नागरिकांची तपासणी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

वाघोली परिसरात ५० ऑक्सिमीटर उपकरणाद्वारे तपासणी सुरू आहे. यामुळे कोरोनाचे निदान होत नाही. मात्र, हृदयांचे स्पंदने, शरीरातील ऑक्सिजन यामुळे अनेक आजार लक्षात येऊ शकतात. त्याद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार सुरू करता येतात. या उपकरणाद्वारे जिल्ह्यातही सर्वेक्षण करून नागरिकांच्या तपासण्या करण्यात येईल. 
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

पुणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शरीरातील ऑक्सिजन कमी होणे या रोगाचे प्रारंभिक लक्षण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत व पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हीड १९ रिसपॉन्स ग्रुपच्या मदतीने शरीरातील ऑक्सिजन तपासण्यासाठी पल्स ऑक्सीमिटर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. वाघोली (ता. हवेली) येथे या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, जिल्ह्यात मोहीम राबविणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. 

पल्स ऑक्सिमीटर हे एक छोटे उपकरण बोटावर लाऊन आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. साधारणतः ९० युनिटपेक्षा जास्त ऑक्सिजनची पातळी ही योग्य समजली जाते. मात्र, त्या पेक्षा कमी पातळी असणे शरीरासाठी घातक असते. कोरोनाच्या रूग्णांत प्रारंभी काही लक्षणे आढळत नाही.

मात्र, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही कमी असते. ही पद्धत कोरोना तपासणीसाठी प्रमुख पद्धत नसली तरी याद्वारे काही प्रमाणात मदत होऊ शकते. या हेतूने तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ९० पेक्षा कमी ऑक्सिजनची पातळी असलेल्या नागरिकांची पुढील तपासणी करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. 

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हीड १९ रिसपॉन्स ग्रुपचे समन्वयक सुधीर मेहता म्हणाले, पल्स ऑक्सिमीटर द्वारे घरोघरी जाऊन तापसणी केली जाणार आहे. या माध्यमातून शासकीय आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण काही प्रमाणात कमी करता येऊ शकेल. वाघोली ग्रामपंचायतीच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात पल्स ऑक्सिमीटरचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...