Agriculture news in marathi People's participation in development works is important: Collector Papalkar | Agrowon

विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ः जिल्हाधिकारी पापळकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अकोला  ः ‘‘महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सुजलाम् सुफलाम् प्रकल्पांतर्गत गावांमध्ये करावयाचे पाणंद रस्ते विकास व जलसंधारण कामांसाठी गावकऱ्यांची एकजूट आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

अकोला  ः ‘‘महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सुजलाम् सुफलाम् प्रकल्पांतर्गत गावांमध्ये करावयाचे पाणंद रस्ते विकास व जलसंधारण कामांसाठी गावकऱ्यांची एकजूट आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील नियोजन भवनात या संदर्भात सरपंच तसेच जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत या प्रकल्पाची माहिती देऊन त्याद्वारे करावयाच्या कामांबाबत माहिती देण्यात आली. या वेळी प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया, भारतीय जैन संघटनेचे संचालक सुशांत भुयान, राज्य प्रकल्प व्यवस्थापक नंदकिशोर लोंढे, लेखा अधिकारी मिलिंद साधू, जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते.

या अभियानाअंतर्गत गावात पाणंद रस्ते तयार करावयाचे आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री ही भारतीय जैन संघटनेमार्फत मोफत देण्यात येणार आहे. फक्त डिझेल व मशिन चालकाचे मानधन हे लोकसहभागातून द्यावयाचे आहे. त्यासाठी गावातील कोणती कामे करावयाची यावर एकमत होऊन त्यानुसार नियोजन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गावात सामंजस्य असणे आवश्यक आहे. , असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. नंदकिशोर लोंढे, प्रा. गादिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी गाढवे यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...