Agriculture news in marathi People's representatives regarding reservation Declare your responsibility | Page 2 ||| Agrowon

आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी जाहीर करावी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६) कोल्हापुरातून सुरू होणाऱ्या मूक आंदोलनस्थळीची पाहणी खासदार संभाजीराजे यांनी केली. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आजपासून (ता. १६) कोल्हापुरातून सुरू होणाऱ्या मूक आंदोलनस्थळीची पाहणी खासदार संभाजीराजे यांनी केली. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीचा आढावा त्यांनी मंगळवारी (ता. १५) घेतला. शाहू महाराजांच्या जन्मस्थळी हे आंदोलन होईल. आंदोलन शांततेत करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

संभाजीराजे या आंदोलनाची माहिती देताना म्हणाले, ‘‘सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार आहे. आमदार, खासदार आणि जिल्ह्यातील पालकमंत्री या सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल.

एका बाजूला, महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी, अशी ती बैठक व्यवस्था असेल. त्या ठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्या जागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी. या आंदोलनात कोल्हापूरसह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमोर येऊन सन्मानपूर्वक भूमिका मांडावी.’’ दरम्यान, या आंदोलनात राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री सहभागी होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे दिली आहे.

मराठा आंदोलनात दोन मंत्री सहभागी होणार : अजित पवार
पुणे : छत्रपती संभाजीराजे यांना आंदोलनाऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. आमचा आंदोलनाला विरोध नाही, मात्र कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. कोल्हापुरातील मूक आंदोलनामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री सहभागी होतील, अशी माहितीही या वेळी अजित पवार यांनी दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...