लोकप्रतिनीधींनी प्रशासनास सहकार्य करावे : कृषिमंत्री भुसे 

मालेगाव, जि. नाशिक : येत्या २४ एप्रिलपासून रमजान सारख्या पवित्र धार्मिक सणाची सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने शासनामार्फत गरजू लाभार्थ्यांना त्यापूर्वी संपूर्ण लाभ मिळावा. यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले.
People's representatives should cooperate with administration: Minister of Agriculture Bhus

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, प्राताधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

शहरात पुरवठा होत असलेल्या भाजीपाला व दुध व अत्यावश्यक सेवा यांचे नियोजन त्यांनी उपस्थितांकडून जाणून घेतले. तर शहरातील सर्व नगरसेवकांमार्फत त्यांच्या प्रत्येक वार्डामधील जे लोक शासनाच्या लाभापासून वंचित आहेत, अशा कुटुंबांची यादी तयार करून त्यांना सेवाभावी संस्थाकडून मिळणारी मदत पोहचविण्याचे नियोजन करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मालेगाव शहरातील ‘कोरोना’च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासनामार्फतही चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. आरोग्य प्रशासनास कुठल्याही साधन सामुग्रीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

राष्ट्रीय आपत्ती हाताळतांना संवेदनशीलता बाळगा  जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ सामाजिक संकट ‘कोरोना’ विषाणूमुळे आपल्या सगळ्यांवर आलेल आहे. यामुळे राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली असून, राष्ट्रीय आपत्ती हाताळतांना अतिसंवेदनशील राहून प्रत्येकाने चोखपणे जबाबदारी पार पाडावी. त्याचबरोबर सर्व विभाग प्रमुखांनी आपसात समन्वय राखून एकत्रितपणे ‘कोरोना’शी लढा देत आपल्या लोकसेवेला न्याय द्यावा. अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com