agriculture news in marathi Pepin, pectin formation from papaya | Agrowon

पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मिती

आरती मुंडे, ऋषिकेश गुर्जर
शनिवार, 25 जुलै 2020

पपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी असतात. त्यामुळे हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

पपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी असतात. त्यामुळे हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.

गर

 • पूर्ण पक्व आणि पिकलेल्या पपईपासून गर वेगळा करावा. या गरापासून वेगवेगळी पेय तयार करता येतात.
 • पूर्ण पक्व फळे स्वच्छ करून त्याच्या फोडी कराव्यात. त्यांची साल काढून यांत्रिक फ्रूट क्रशर किंवा घरगुती मिक्सरद्वारे गर बारीक करून घ्यावा.
 • हा गर चाळणीतून गाळून त्यातील तंतुमय भाग वेगळा करावा.
 • ताज्या गराचा वापर विविध पदार्थांच्या निर्मितीसाठी केला जातो. हा गर अधिक काळ टिकवण्यासाठी त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करणे किंवा गोठवणे किंवा कॅनिंग करावे लागते.

पेपेन निर्मिती 

 • भारतामध्ये पेपेन निर्मितीसाठी सीओ-२ आणि सीओ-६ या जातींची शिफारस आहे.
 • पेपेन काढण्यासाठी अर्ध पक्व फळे (९० ते १०० दिवसांच्या कालावधी) निवडली जातात.
 • फळांच्या चारही बाजूने खालून वरपर्यंत बांबूला लावलेल्या धारदार चाकू किंवा खास अवजाराद्वारे ०.३ सेंमी खोल रेषा मारल्या जातात. ही क्रिया सकाळी नऊ वाजण्याच्या आत केली जाते.
 • फळाला मारलेल्या रेषांतून बाहेर पडणारा चीक हा काचेच्या भांड्यामध्ये किंवा अॅल्युमिनिअमच्या ट्रेमध्ये गोळा केला जातो. तीन ते चार दिवसांच्या अंतराने अशाच खोल रेषा फळांवर अन्य ठिकाणी तीन वेळा मारल्या जातात.
 • गोळा झालेला चीक हा पंधरा मिनिटांमध्ये घट्ट होतो.चिकाचा साठवण कालावधी वाढण्यासाठी चीक द्रवरूप अवस्थेमध्ये असताना त्यात ०.०५ टक्के पोटॅशिअम मेटा बायसल्फेट मिसळले जाते.
 • साधारण ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्प्रे ड्राईंग किंवा सूर्यप्रकाशामध्ये हा द्रवरूप चीक वाळवावा.वाळवलेल्या चिकापासून पावडर तयार करून १० मेश जाडीच्या चाळणीतून गाळून घ्यावी.
 • भुकटीच्या स्वरूपामध्ये असलेल्या पेपेनची साठवण पॉलिईथीलीन पिशव्यांमध्ये किंवा हवाबंद काचेच्या भांड्यामध्ये करावी.१० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ही भुकटी सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते.
 • पेपेन निर्मितीसाठी व्हॅक्युम सेल्फ ड्रायर, डिह्युमिडीफायर, हॅमर मिल, ब्लेंडर या यंत्रांची आवश्यक असतात.

पेक्टिन

 • कच्ची हिरवी फळे किंवा चीक काढल्यानंतर राहणारी फळे ही पेक्टिन निर्मितीसाठी वापरता येतात.
 • हिरव्या पपईमध्ये कोरड्या वजनाच्या आधारावर पेक्टिनचे प्रमाण १० टक्के असते.
 • टाकाऊ ठरलेल्या हिरव्या पपईच्या सालीपासूनही पेक्टिन मिळवता येते.
 • खाद्य आणि औषध उद्योगामध्ये पेक्टिनचा वापर करतात.

पपईचे आरोग्यदायी फायदे
पपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी असतात. त्यामुळे हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे.

 • पपई सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोटाचे रोग, हृदयरोग, आतड्यांचे रोग दूर होतात.
 • पपईत ए, बी, डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. त्वचेचे रोग दूर होतात. जखम लवकर भरून येते. मूत्राशयाचे आजार दूर होतात. लठ्ठपणा दूर होतो.
 • पपई रसामुळे अरुची दूर होते. डोकेदुखी(अजीर्णामुळे) दूर होते. पपई पांढऱ्या पेशींची वाढ करणारी आहे.
 • गरोदारावस्थेमध्ये स्त्रियांनी पपई खाणे टाळावे. पपई उष्ण असल्याने गरोदर स्त्रियांना त्रास होतो.
 • पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
 • पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
 • वजन कमी करण्यास उपयुक्त फळ आहे. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते. पपईने भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.
 • पपई खाण्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते.
 • त्वचेचे आरोग्य कायम राखण्यास मदत होते.
 • शरीरातील अवयवांवरील सूज कमी करण्यास मदत करते. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते.
 • पपईच्या सेवनाने ह्रदयाच्या मांस पेशी मजबुत होतात.
 • सूज, ठणक या व्याधींमध्ये पपईची पाने गरम करून बांधतात. ही आयुर्वेदाची एक चिकित्सा आहे.
 • कच्ची पपई कृमी, यकृत विकारात उपयुक्त ठरते.

पोषक मूल्ये
घटक.....................प्रमाण
उष्मांक..................६२
फॅट.......................०.४ ग्रॅम
सोडियम.................११. ६ ग्रॅम
कर्बोदके.................१६ ग्रॅम
तंतू........................२.५ ग्रॅम
साखर.....................११ ग्रॅम
प्रथिने......................०. ७ ग्रॅम
क जीवनसत्व............८८. ३ मिली ग्रॅम

संपर्क- आरती मुंडे, ९५०३०८२५६४
ऋषिकेश गुर्जर, ८८८८३७२४४५
(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्नतंत्रज्ञान विभाग, सॅम हिगिनबॉटम कृषी, प्रौद्योगिक आणि विज्ञान विश्वविद्यालय प्रयागराज, उत्तरप्रदेश)


इतर कृषी प्रक्रिया
लघू प्रक्रिया उद्योगांना चांगली संधीलघू उद्योगासाठी बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी...
ड्रॅगन फळापासून कॉर्डीयल, स्क्वॅश...ड्रॅगन फळ हे हायलोसेरियस आणि सेलेनेसियस या...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
मखानापासून बनवा बर्फी, लाह्या अन् चिक्कीदलदलीच्या क्षेत्रात उगवणारे मखाना हे भरपूर...
कृषी क्षेत्रामध्ये आहेत व्यावसायिक संधीव्यावसायिक संधी म्हणून शेती व संलग्न बाबींकडे...
चिकूपासून बनवा आइस्क्रीमआइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला...
पपईपासून पेपन,पेक्टिन निर्मितीपपईचे फळ पचनास मदत करते. त्याचा गर व बिया औषधी...
भोपळ्यापासून बर्फी, चिक्कीभोपळा हृदयरोगांसाठी  उपयुक्त आहे. यातील घटक...
चिकूपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थचिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) हे गोड,...
प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणीवाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि...
शेळीच्या दुधापासून दही, लोणी, चीज, मलईशेळीचे दूध पचनास हलके असते. शेळीच्या दुधापासून...
श्रीवर्धनी सुपारीचे संवर्धन आवश्यकसुपारी हे परपरागीकरण होणारे झाड असल्याने...
फणसामध्ये आहे प्रक्रिया उद्योगाची संधीफणसातील गरे तसेच बिया खाण्यायोग्य असून गरापासून...
फणसापासून तयार करा खाकरा, केक अन् लोणचेविविध पदार्थांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी फणस बी...
प्रक्रिया उद्योगात गवती चहाला मागणीगवती चहामध्ये अत्यावश्यक तेल असते. हे तेल सुगंधीत...
बहुगुणी शेवग्याचे मूल्यवर्धित पदार्थशेवग्यामध्ये उच्च पौष्टिक आणि औषधी मूल्य आहेत....
प्रक्रिया अन् आरोग्यासाठी शेवगाशेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारे मेगा...शेतकरी, प्रक्रिया करणारे आणि किरकोळ विक्रेत्यांना...
कोकमपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकम फळ कच्चे असताना व पिकून लाल रंगाचे झाल्यावर...
करवंदापासून बनवा चटणी,जॅम, लोणचेकरवंद प्रक्रियेसाठी मोठ्या भांडवली गुंतवणुकीची...