agriculture news in marathi, PepsiCo India to invest Rs 514 cr to set up snacks plant in UP | Agrowon

उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा खाद्यपदार्थ प्रकल्प
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जुलै 2019

नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी कंपनी असलेली पेप्सिको इंडिया उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा खाद्यपदार्थ प्रकल्प उभारणार आहे. या संदर्भातील परस्पर सामंजस्य करार नुकताच गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी कंपनी असलेली पेप्सिको इंडिया उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा खाद्यपदार्थ प्रकल्प उभारणार आहे. या संदर्भातील परस्पर सामंजस्य करार नुकताच गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. 

२०२२ पर्यंत खाद्यपदार्थ व्यवसायात दुप्पटीचे लक्ष गाठण्यासाठी कंपनी नवे गुंतवणूक धोरण राबविणार आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यात सुमारे १५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणार आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने भारतीय अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद अलशेख म्हणाले,‘‘पेप्सिको कंपनी भारतात खाद्यपदार्थ निर्मितीत वाढीसाठी वचनबद्ध आहे. उत्तर प्रदेशातील लोकांबरोबर आमचे जुने संबंध आहेत. येत्या काही वर्षांत खाद्यपदार्थ उत्पादन दुप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, याअनुषंगाने आम्ही उत्तर प्रदेशात ५१४ कोटींच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करत आहोत.’’

या उद्योगाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही स्थानिक शेतकऱ्यांना चांगले पीक उत्पादन आणि व्यवस्थापन पद्धती पुरवू, जेणे करून उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत होईल, असे अलशेख म्हणाले. पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी पेप्सिको इंडिया कंपनी शीतगृह सुविधा राज्यात उभी करेल, असे त्यांनी सांगितले. 

कंपनीकडून बटाटा खरेदी...
पेप्सिको इंडिया कंपनी ३० वर्षांपासून भारतातील शेतकऱ्यांशी संलग्न असून, सध्या लेज आणि अंकल चिप्स या उत्पादनाकरिता देशभरातील १३ राज्यांतील सुमारे २४ हजार शेतकऱ्यांकडून बटाटा विकत घेते.

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...