पेप्सिकोकडून गुजरातमधील शेतकऱ्यांवरील दावा मागे

शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे थेट दावे दाखल करणे अयोग्य आहे. लवकरच कंपनीचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री व राज्याचे मुख्य कृषी सचिव यांची बैठक होणार आहे. बैठकीत शेतकऱ्यांना बोलविण्यात काही अर्थ नाही, त्यांची बाजू आम्ही मांडू. - नितीन पटेल, उपमुख्यमंत्री, गुजरात
पेप्सिकोकडून गुजरातमधील शेतकऱ्यांवरील दावा मागे
पेप्सिकोकडून गुजरातमधील शेतकऱ्यांवरील दावा मागे

अहमदाबाद:  गुजरातमधील शेतकऱ्यांनी विनापरवाना पेप्सिको कंपनीकडे मालकी हक्क असलेल्या बटाटा वाणाची लागवड केल्याने कंपनीने त्यांच्यावर एक कोटी रुपयांचा न्यायालयीन दाखल केलेला दावा मागे घेतला आहे. ‘‘केंद्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गुजरातमधील शेतकऱ्यांवरील दावा मागे घेतला आहे. आम्ही बियाणे संरक्षणासाठीच्या सर्व प्रश्‍नांवर दीर्घकालीन आणि मैत्रिपूर्ण ठरावांवर चर्चेवर अवलंबून आहोत,’’ असे पेप्सिको कंपनीने म्हटले आहे.  पेप्सिको कंपनीने उत्तर गुजरातमधील बटाटा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांवर कंपनीकडे बौद्धिक संपदा हक्क असलेल्या ‘एफएल २०१७’ किंवा ‘एफसी५’ या वाणाची विनापरवाना लागवड केल्याप्रकरणी न्यायालयीन दावा दाखल केला होता. गेल्या वर्षी याच कारणावरून पाच शेतकऱ्यांवर तर यंदा चार शेतकऱ्यांवर कंपनीने दावा ठोकला होता. कंपनीच्या लेज् या ब्रॅँडखाली या वाणाच्या बटाट्याचे वेफर्स बनविते.  ‘‘आमच्या काम करणाऱ्या देशातील हजारो शेतकऱ्यांच्या प्रति कंपनी कटिबद्ध आहे आणि शेतीचे अद्ययावत पद्धती आत्मसात करण्याकडे कंपनीचा कल आहे. शेतकऱ्यांवर ठोकलेला न्यायालयीन दावा कंपनीसोबत काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि कंपनीकडे मालकी हक्क असलेल्या वाणाचे संरक्षण करण्यासाठी होता,’’ असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.   कंपनीने शेतकऱ्यांवर दावा दाखल केला तेव्हा देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. देशातील जवळपास १९२ शेतकरी संघटना, साजसेवक आणि कार्यकर्त्यांनी कंपनीच्या या निर्यायाला विरोध केला. तसेच राजकीय पक्षांशी संबंधीत असलेल्या भारतीय किसान संघ यासारख्या शेतकरी संघांनीही कंपनीच्या कारवाईला विरोध केला. काही राजकीय व्यक्तींनीही या प्रकरणात उडी घेतल्याने शेवटी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत ‘‘गुजरात सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करेल,’’ असे घोषित केले. पटेल यांनी शेतकरी आणि कंपनीमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडली. शेवटी पेप्सिको कंपनी आपल्या हिताच्या दीर्घकालीन निर्णयावर न्यायालयाबाहेर वाद मिटविण्यास तयार झाली. शेतकऱ्यांचा विजय पेप्सिको कंपनीने शेतकऱ्यांवर दावे दाखल केल्यापासून शेतकऱ्यांची बाजू मांडणारे कार्यकर्ते म्हणाले, की कंपनीने बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल केलाला दावा मागे घेतल्याने भारतीय शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. दावा मागे घेताना पेप्सिको आणि सरकारमध्ये काय बोलणी झाली हे आम्हाला माहित नाही, मात्र दावा मागे घेतल्याने ‘शेतकऱ्यांचा हक्क’  मान्य झाला आहे.  काय आहे ‘एफसी ५’? पेप्सिको कंपनीने १९८९ मध्ये पहिला बटाटा चिप्स कारखाना सुरू केला. त्यानंतर कंपनीने पहिल्यांदा २००९ मध्ये ‘एफसी ५’ हे बटाटा वाण व्यापारी वापराकरिता आणले. या वाणामध्ये ओलावा कमी असल्याने चिप्स उद्योगासाठी एक वरदान ठरले. हे वाण विकसित करण्यासाठी चिप्समध्ये स्टार्चचे साखरेत होणारे रुपांतरणाचा दर कमी करणारे जेनेटिक्स इंजिनिरिंग टेक्निक वापरण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com