agriculture news in marathi, The percentage of poll in Marathwada decreased slightly | Agrowon

मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

बीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी मतदारसंघांसाठी गुरुवारी (ता. १८) मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता शांततेत झालेल्या या मतदानात बीड लोकसभा मतदारसंघात ६६.०६ टक्‍के, लातूर मतदारसंघात  ६२.१७ टक्‍के, उस्मानाबाद मतदारसंघात ६३.४२ टक्‍के मतदारांनी मतदान केले. याचबररोबर लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघांत एकूण ५४ लाख ३४ हजार २७३ मतदारांपैकी ३५ लाख २५ हजार २७६ (सरासरी ६४.८७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

बीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी मतदारसंघांसाठी गुरुवारी (ता. १८) मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता शांततेत झालेल्या या मतदानात बीड लोकसभा मतदारसंघात ६६.०६ टक्‍के, लातूर मतदारसंघात  ६२.१७ टक्‍के, उस्मानाबाद मतदारसंघात ६३.४२ टक्‍के मतदारांनी मतदान केले. याचबररोबर लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघांत एकूण ५४ लाख ३४ हजार २७३ मतदारांपैकी ३५ लाख २५ हजार २७६ (सरासरी ६४.८७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ४१ हजार १८१ मतदारांपैकी १३ लाख ४८ हजार ४७३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला. मतदानाची टक्‍केवारी ६६.०६ टक्‍के इतकी नोंदली गेली. लातूरमध्ये ६२.१७ टक्के मतदान झाले. १८ लाख ८३ हजार ५३५ मतदारांपैकी ११ लाख ७० हजार  ९४४ मतदारांनी मतदान केले. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६२.७३ टक्के मतदान झाले होते. गतवेळीच्या तुलनेत या वेळी त्यात किंचित घट झाली. 

एकूण १८ लाख ७१ हजार ३८१ मतदार असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात ११ लाख ९६ हजार १६६ महिला व पुरुष मतदारांनी मतदान केले. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत ६३.६५ टक्‍के मतदान झालेल्या या मतदारसंघात या वेळी मतदानाचा टक्‍का किंचित कमी होऊन ६३.४२ टक्‍के इतका राहिला. 

नांदेड, हिंगोलीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ, परभणीत घट

लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघांत एकूण ५४ लाख ३४ हजार २७३ मतदारांपैकी ३५ लाख २५ हजार २७६ (सरासरी ६४.८७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नांदेड, हिंगोलीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ, तर परभणीत त्यात घट झाली.

नांदेड लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ६०.११ टक्के मतदान झाले होते. यंदा प्रशासनाने केलेल्‍या मतदान जनजागृतीमुळे ५ टक्‍क्‍यांनी मतदानाचा टक्‍का वाढला आहे. परभणीत १९ लाख ८३ हजार ९०३ मतदारांपैकी एकूण १२ लाख ५३ हजार ६१२ (६३.१९ टक्के) मतदारांनी मतदान केले. हिंगोली मतदारसंघात १७ लाख ३२ हजार ५४० मतदारांपैकी असे एकूण ११ लाख ५२ हजार ५४८ मतदारांनी (६६.५२ टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...