Agriculture news in marathi; The percentage of rainfall in Khandesh is increasing | Agrowon

खानदेशात पावसाची टक्केवारी वाढतीच
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशात मागील वर्षाच्या तुलनेत पाऊसमान चांगले असून, पावसाळा संपण्यास आणखी ४३ दिवस अधिकृतपणे राहिले आहेत. यादरम्यान टप्प्याटप्प्यात पावसाने हजेरी लावली तर पाऊस १०० टक्‍क्‍यांवर जाईल. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६७ टक्के, धुळ्यात ६४ टक्के आणि नंदुरबारात १५८ टक्के पाऊस झाल्याची माहिती आहे. 

जळगाव ः खानदेशात मागील वर्षाच्या तुलनेत पाऊसमान चांगले असून, पावसाळा संपण्यास आणखी ४३ दिवस अधिकृतपणे राहिले आहेत. यादरम्यान टप्प्याटप्प्यात पावसाने हजेरी लावली तर पाऊस १०० टक्‍क्‍यांवर जाईल. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात सरासरीच्या ६७ टक्के, धुळ्यात ६४ टक्के आणि नंदुरबारात १५८ टक्के पाऊस झाल्याची माहिती आहे. 

नंदुरबारात मागील पंधरवड्यात अतिवृष्टी झाली. नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, खर्डी, कन्हेरी, सुसरी, गोमाई आदी सर्वच नद्यांना पूर आले. नंदुरबारमधील पूरस्थिती ओसरली आहे. मागील वर्षी नंदुरबारात ऑगस्टच्या मध्यापर्यंत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नव्हता. नंदुरबार, शहादामध्ये दुष्काळी स्थिती होती.

मिरची पिकाला नंदुरबार तालुक्‍यातील कोठली, पाचोराबारी, पळाशी, धमडाई, पथराई, कोळदे, लहान शहादे आदी भागात मोठा फटका बसला होता. धुळ्यात शिरपूर व साक्रीमधील काही महसूल मंडळे वगळता अतिवृष्टी झाली नाही. साक्री भागातील जोरदार पावसामुळे पांझरा नदीला पूर आला होता. धुळे जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टअखेर ५० टक्केही पाऊस झाला नव्हता. 

जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ६५ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी ऑगस्टच्या मध्यातच ६७ टक्‍क्‍यांवर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७६५ मिलिमीटर, धुळ्यात ९२५ आणि नंदुरबारात सुमारे ११०० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. यावर्षी पाऊसमान बरे असल्याने पावसाची टक्केवारी वाढत आहे. मागील दोन दिवसांतही धुळे, नंदुरबार व जळगावमधील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

गेल्या २४ तासात शनिवारी सकाळी आठपर्यंत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, जामनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, रावेर येथे पावसाने हजेरी लावली. पावसाळा संपण्यास आणखी ४३ दिवस अधिकृतपणे राहिले आहेत. यादरम्यान पाऊसमान व्यवस्थित राहिले तर सरासरी १०० टक्‍क्‍यांवर जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. 

इतर ताज्या घडामोडी
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...