Agriculture news in Marathi, Perennials on farmers' accounts since Saturday | Agrowon

सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात जमा होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर पीकविम्यापोटी जिल्ह्याला १७ कोटी ४६ लाख ८८ हजार रुपये रक्कम आली आहे. जिल्ह्यात सात हजार ७९५ शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार असून, शनिवारी (ता. १५) पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ही विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे यांनी दिली.

सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर पीकविम्यापोटी जिल्ह्याला १७ कोटी ४६ लाख ८८ हजार रुपये रक्कम आली आहे. जिल्ह्यात सात हजार ७९५ शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार असून, शनिवारी (ता. १५) पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ही विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला असून, या विम्याच्या भरपाई पोटी शेतकऱ्यांना विमा रक्कम मंजूर झाली आहे. आंबे बहर कालावधीतील ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला होता, त्या शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर आहे. या योजनेत सात हजार ७९५ शेतकऱ्यांनी डाळिंब, केळी, द्राक्ष, आंबा पिकांचा समावेश आहे.

या पिकाच्या भरपाईपोटी कंपनीकडून १७ कोटी ४६ लाख ८८ हजार १९ रुपये इतकी विमा रक्कम मंजूर केली असून, ही रक्कम कृषी विभागाकडे पार्त झाली आहे. त्याचे वाटप शनिवारपासून करण्यात येणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. 

रब्बी २०१८-१९ या वर्षातीलही पिकांचा विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरविला आहे, त्याचीही भरपाई लकरच मिळणार आहे. सध्या आटपाडी तालुक्यातील दोन मंडलांतील ५२ इतकी रक्कम आली आहे. त्याचेही वाटप केले जाईल. पीकविमा ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व अडचणीच्या कालावधीत उपयोगी पडणारी आहे. जिल्ह्याला पीकविम्याच्या भरपाई रकमेने यंदा जिल्ह्यात रेकॉर्ड केले आहे. आतापर्यंत पीकविम्याच्या भरपाईपोटी शंभर कोटींवर रक्कम आली आहे. त्यामध्ये खरीप २०१८ चे ३० कोटी, डाळिंबाचे ६२ कोटी आणि आंबिया बहरातील साडेसतरा कोटी इतकी रक्कम विम्यापोटी आली आहे. आणखी २५ ते ३० कोटी इतकी रब्बीची भरपाई येण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील पीकविमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. सध्या खरीप हंगामातील पीकविमा योजना सुरू आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

- राजेंद्र साबळे, जिल्हा कृषी अधीक्षक सांगली

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...