Agriculture news in marathi Permanent revocation of licenses of linking agricultural service centers | Agrowon

लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

अकोला जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.

अकोला : जिल्ह्यात बियाणे, खत विक्रीत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अखेरीस कडक पाउले उचलली असून, तेल्हारा येथील लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. या शिवाय तीन कृषी सेवा केंद्राचे बियाणे विक्री व एकाचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला. या शिवाय काहींना सक्त ताकीदही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या हंगामाला सुरुवात झाली तेव्हापासून सोयाबीन बियाणे व खत विक्रीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही विक्रेत्यांनी वेठीस धरल्याची प्रकरणे समोर आली होती. शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारींचा ओघ वाढला होता. काही ठिकाणी कृषी विभागाच्या पथकांनी पाहणी केली तेव्हा या तथ्य आढळून आले. 

तेल्हारा येथील विक्रेत्याने तर सोयाबीन बियाणे हवे असेल तर कपाशी बियाणे घ्यावे लागेल, अशी सक्ती चालवली होती. या बाबत शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर तेथील कृषी विभाग जागा झाला. त्यानंतर चौकशी करून वरिष्ठांना अहवाल दिला. 

या प्रकरणी सोमवारी (ता. १४) अकोल्यात सुनावणी घेण्यात आली. यापैकी काही विक्रेत्यांकडे तपासणी दरम्यान कागदपत्रांची पूर्तता नव्हती. अशा विविध कारणांनी कृषी सेवा केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.  तेल्हारा येथील दधिमती कृषी सेवा केंद्राचा बियाणे खरेदी-विक्रीचा परवाना सोमवारपासून कायमस्वरुपी रद्द 
करण्यात आला आहे. या बाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. बी. खोत यांनी आदेश काढले.

कृषी केंद्र आणि झालेली कारवाई
१) गणेश कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- एक महिना निलंबित, २) अमोल कृषी सेवा केंद्र, आलेगाव- तीन महिने निलंबन, ३) गजानन कृषी सेवा केंद्रा, बार्शीटाकळी- १५ दिवस निलंबन, ४) दधिमती कृषी सेवा केंद्र, तेल्हारा- परवाना रद्द, ५) पुष्कर ॲग्रो एजन्सी, तेल्हारा- ताकीद, ६) यश कृषी सेवा केंद्र, दानापूर-ताकीद, ७) सद्‌गुरू कृषी सेवा केंद्र, दानापूर- ताकीद, ८) महालक्ष्मी सीडस, तेल्हारा- ताकीद, ९) सरिता कृषी सेवा केंद्र, तेल्हारा-ताकीद.

यापूर्वी झालेली कारवाई

१) प्रकाश ट्रेडिंग कंपनी, अकोला- एक महिना खत परवाना निलंबित, २) तिरुपती कृषी सेवा केंद्र, अकोला- ताकीद.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...