agriculture news in Marathi permission for cotton seed sell from 1st June Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कापूस बियाणे विक्री एक जूनपासून 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करतील.

पुणे ः राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करतील. मात्र बोंड अळीचा धोका विचारात घेता शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रत्यक्ष विक्री एक जूनपासून सुरू होईल. 

राज्यात गेल्या खरीप हंगामात २१ मेपूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी निर्बंध अचानक शिथिल केले व एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे. 

महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा वितरण विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्‍चितीकरण यांचे विनियमन) कायदा २००९ मधील तरतुदींचा आधार घेत कृषी विभागाने या तारखा निश्‍चित केल्या आहेत. मात्र या तारखांचे उल्लंघन झाल्यास कंपनी, वितरक, किरकोळ विक्रेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यात २०१७ मध्ये गुलाबी बोंड अळीची मोठी साथ आली होती. बियाणे लवकर उपलब्ध झाल्यास त्याची लागवड देखील लवकर होते. त्यामुळे पुढे लागवडीचे वेळापत्रक थेट बोंड अळीच्या जीवनचक्राला पोषक ठरते. त्यामुळेच २०१८, २०१९ आणि २०२० या तीनही हंगामांत राज्यात अभियान हाती घेण्यात आले होते. यंदा देखील बोंड अळीसाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

कंपन्यांकडून १० मेपासून वितरकांना पुरवठा 
कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करण्यास सुरुवात करतील. वितरकांना १५मे पूर्वी कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला या बियाण्यांचा पुरवठा करता येणार नाही. तसेच, पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना एक जूनपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे विकता येणार नाही, असे आदेश कृषी विभागाने जारी केले आहेत. 

प्रतिक्रिया
राज्यात कपाशीचे बियाणे मुबलक आहे. मात्र गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळेच बियाणे विक्री एक जूनपूर्वी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- दिलीप झेंडे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग) 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...