agriculture news in Marathi permission didnt given for vegetable selling Maharashtra | Agrowon

नगरमध्ये भाजीपाला विक्रीला बंदी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नगर शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन केले आहे.

नगर ः कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नगर शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी भाजीपाल्याची विक्री करण्याला बंदी घातली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. बाजारातही भाज्यांचे दर पडले असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

जिल्ह्यात दररोज चार हजार कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्यात नगर शहरातील आकडा आठशेच्या जवळपास आहे. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात सकाळी सात ते आकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा, फळे-भाजीपाला विक्री करता येत होती. मात्र रुग्णसंख्या कमी होत नसल्याने सोमवारपासून (ता.३)) शहरात लॉकडाऊन अधिक कडक केला आहे. दूध व आरोग्य सेवा वगळता सर्व बाबी बंद ठेवण्याचा महापालिका आयुक्तांनी आदेश काढला आहे. 

याशिवाय नगर शहरातील दादा पाटील शेळके बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव बंद होते. तरी शेतकरी रस्त्यावर भाजीपाला, फळांची विक्री करत होते. तेथील विक्री बंद करुन ती नेप्ती उपबाजारात नेली आहे. शहरात रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे विक्री करता येणार नसल्याने स्थानिक विक्रेते, शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. शहरात भाजीपाला, विक्री करता येणार नसल्याचे सांगत दरही पाडले आहे. या सर्व प्रकाराने शेतकरी हतबल झाले आहेत. 

कृषी विभागाचा समन्वय नाही 
कडक लॉकडाऊन केला असला तरी शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांची विक्री करता यावी यासाठी कृषी विभागाने समन्वय साधणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी असा समन्वय साधून अनेक शेतकरी, विक्रेत्यांना कडक लॉकडाऊनच्या काळात कृषी विभागाने विक्रीसाठी संधी उपलब्ध करुन दिली होती. यंदा मात्र फळे, भाजीपाला विक्रेत्यांना कृषी विभागाने अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखे झाले आहे. यंदा भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...