agriculture news in Marathi permission for distribution 500 crore of crop insurance Maharashtra | Agrowon

पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास मंजुरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९ साठी राज्य शासनाच्या हिश्शाचा पीकविमा हप्ता अनुदानाचा पाचशे कोटींचा निधी राज्य शासनाने वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. कृषी विभागाने बुधवारी (ता. १९) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. 

राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती. या योजनेतील त्रुटी दूर करून खरीप २०१६ हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना लागू झाली आहे. गेल्या काही वर्षांतील हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे.

मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९ साठी राज्य शासनाच्या हिश्शाचा पीकविमा हप्ता अनुदानाचा पाचशे कोटींचा निधी राज्य शासनाने वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. कृषी विभागाने बुधवारी (ता. १९) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. 

राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती. या योजनेतील त्रुटी दूर करून खरीप २०१६ हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना लागू झाली आहे. गेल्या काही वर्षांतील हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर पीकविमा योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरली आहे.

नैसर्गिक असमतोलामुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ शकते. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून पीकविमा योजना महत्त्वपूर्ण ठरली आहे.

योजनेअंतर्गत खरिपासाठी दोन टक्के आणि रब्बीसाठी दीड टक्का इतका, तर फळबागांसाठी पाच टक्के इतका कमी हप्ता आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ९० टक्के अनुदान दिले जाते. गेल्या मागील काही वर्षांत खरीप आणि रब्बी हंगामात दरवर्षी सरासरी ७७ लाख शेतकरी या योजनेत सहभागी होतात.

या योजनेतून दरवर्षी सरासरी ५५ लाख शेतकऱ्यांना सुमारे २ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई विमा कंपन्यांनी दिल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, या योजनेत अनेक त्रुटी आहेत. या योजनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित करण्याची पद्धत अशास्त्रीय आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या नाही तर कंपन्यांच्या हिताची असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात दहा जिल्ह्यांकडे विमा कंपन्यांनी पाठ फिरवली होती.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...