साखरेपासून इथेनाॅल निर्मितीला मान्यता

देशातील तेल विपणन कंपन्या २०१९-२० मध्ये २६० कोटी लिटर इथेनॉल खरेदी करणार आहेत. यामुळे देशाचे तेल आयातीवरअसलेले अवलंबित्व कमी होण्यास मदतहोईल. पुढील वर्षी देशाचे आयातीवरहोणारे १०० कोटी रुपये वाचणार आहेत. - धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम मंत्री
इथेनाॅल
इथेनाॅल

नवी दिल्ली : थेट साखरेपासून इथेनॉल निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. तसेच ‘सी’ हेव्ही मोलॅसिस, ‘बी’ हेव्ही मोलॅसिस आणि थेट उसाचा रस, साखर आणि साखरयुक्त पदार्थांपासून निर्मित केलेल्या इथेनॉलच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ शासकीय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांच्या खरेदीसाठी आहे. केंद्र सरकारने तीनही प्रकारच्या इथेनॉलच्या खरेदीदरात वाढ केली आहे. ‘सी’ हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रतिलिटर २९ पैशांची वाढ केली असून ४३.४६ रुपयांवरून प्रतिलिटर ४३.७५ रुपयांवर दर पोचला. ‘बी’ हेव्ही मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर १.८४ रुपये वाढ करण्यात आली आहे. आता ‘बी’ हेव्ही मोलॅसिसचा दर ५२.४३ रुपयांवरून प्रतिलिटर ५४.२७ रुपयांवर पोचला आहे. तर थेट उसापासून निर्मित होणाऱ्या इथेनॉलसाठी ३५ पैशांची वाढ करण्यात आली असून ५९.१३ रुपये असणारा दर प्रतिलिटर ५९.४८ रुपयांवर पोचले आहे. 

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इथेनॉलचे दर वाढविल्याने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी देणे सोपे होईल. तसेच कारखान्यांनी थकबाकी जमा केल्यास शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाचाच हा एक भाग आहे. तसेच देशात इथेनॉलचा वापर वाढल्याने प्रदूषणही कमी होईल. २०१४ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण चार पटीने वाढले असून ते १० टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. २०१४ मध्ये ३८ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित केले होते. त्यात वाढ होवून २०१७-१८ मध्ये १४१ लिटर इथेनॉल मिश्रित करण्यात आले आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com