कृष्णपुरम कांदा निर्यातीस मान्यता

कृष्णपुरम कांदा निर्यातीस मान्यता
कृष्णपुरम कांदा निर्यातीस मान्यता

पुणे: राज्यात नवीन कांद्याची आवक बाजार समित्यांमधून मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दर घटण्यास सुरुवात झाली आहे. घटणारे दर स्थिर राहण्यासाठी केंद्राने कांदा निर्यात सुरू करावी, अशी मागणी होत असतानाच केंद्र सरकारने आंध्र प्रदेशातील कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. मार्चअखेर दहा हजार टन कांदा निर्यातीस मान्यता दिली आहे.  विदेश व्यापार विभागाचे महासंचालक अमित यादव यांनी गुरुवारी (ता. ६) नोटिफिकेशन जारी केले आहे. मात्र केवळ आंध्र प्रदेशातील कांद्याला निर्यातीला परवानगी असून, महाराष्ट्रातील कांद्यालादेखील निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  यंदा लांबलेला पाऊस, पूरस्थिती, अवकाळी पाऊस यामुळे खरिपातील कांद्याचे मोठे नुकसान झाले होते. तर रब्बी हंगामातदेखील अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई झाल्याने कांदा आयात करावा लागला होता. कांद्याच्या टंचाईमुळे दर मोठ्या प्रमाणावर वाढले होते. यानंतर आता नव्या कांद्याची आवकेला सुरुवात झाल्याने पुणे, नाशिक या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असून, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनदेखील केले.  कांद्याला मागणी बाजारात आवक वाढून दर घसरल्याने कांद्याची निर्यात सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सुरू केली असून, केंद्र सरकारने आंध्र प्रदेशातील कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. हा कांदा तिखट असून, याला थायलंड, हॉंगकॉंग, मलेशिया, श्रीलंका, सिंगापूर येथून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यामुळे या कांद्याची निर्यात खुली करण्यात आल्याचे पणन सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com