बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार टन कांदा होणार निर्यात

बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या १० हजार टन कांद्याला केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने निर्यातीची परवानगी दिली आहे.
bangalore rose onion
bangalore rose onion

नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या १० हजार टन कांद्याला केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने निर्यातीची परवानगी दिली आहे. चेन्नई बंदरावरून हा कांदा निर्यातीस परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  बंगलोर रोझ व कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीसाठी फक्त चेन्नई बंदरावरून परवानगी देण्यात आली असून ३१ मार्च २०२१ निर्यात पूर्ण करण्याबाबत कळविले आहे. निर्यातकामी संबंधित निर्यातदाराला कर्नाटक सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. यासाठी प्रकार आणि प्रमाण प्रमाणित करावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर बेंगलोर येथील विदेश व्यापार महासंचालक कार्यालयात निर्यातदाराच्या माध्यमातून नोंद होईल. हे कार्यालय निर्यातीवर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आहे. बंदरावर निर्यात होण्यापूर्वी सीमाशुल्क प्राधिकरण यांना फलोत्पादन संचालक व अतिरिक्त विदेश व्यापार महासंचालकांचे पत्र महत्वपूर्ण असणार आहे.  कृष्णापुरम कांद्याची निर्यात करताना निर्यातदारांना आंध्र प्रदेश सरकारच्या सहाय्यक संचालक फलोत्पादन, कडप्पा यांचेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्यानंतर कांदा निर्यातीच्या उद्देशाने प्रमाणित करण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची नोंदणी चेन्नई विभागीय अतिरिक्त महासंचालक यांच्याकडे नोंदणी करावी लागणार आहे. हे कार्यालय निर्यातीच्या कामकाजावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनंतर निर्यात प्रक्रियेसाठी आंध्र प्रदेश सरकारच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्राप्त प्रमाणपत्राच्या आधारे सीमाशुल्क प्राधिकरण त्यास निर्यातीसाठी परवानगी देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

कांदा निर्यातीवर अवलंबून कर्नाटक मधील कोलार जिल्ह्यातील उत्पादित बेंगलोर रोझ व आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील कृष्णपुरम वाणाच्या कांद्याचे उत्पादन स्थानिक ठिकाणी मर्यादित प्रमाणावर घेतले जाते. मात्र काढणी पश्चात या कांद्याला स्थानिक बाजारपेठेत मागणी नसल्याने अडचणी येतात. प्रामुख्याने हा कांदा सिंगापूर, मलेशिया येथे लोणच्याच्या निर्मितीसाठी वापरला जात असल्याने सर्व गणित निर्यातीवर अवलंबून असते. त्यामुळे हा निर्णय येथील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.

  आमच्यावर अन्याय का ?  महाराष्ट्राच्या कांद्यालाही निर्यातीची परवानगी देण्याची मागणी होत आहे. केंद्राने येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जो निर्यातीचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निर्यातीस परवानगी देऊन आम्हालाही दिलासा द्या, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com