agriculture news in Marathi permission for export of thousand ton onion Maharashtra | Agrowon

बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार टन कांदा होणार निर्यात

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या १० हजार टन कांद्याला केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने निर्यातीची परवानगी दिली आहे.

नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या १० हजार टन कांद्याला केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने निर्यातीची परवानगी दिली आहे. चेन्नई बंदरावरून हा कांदा निर्यातीस परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बंगलोर रोझ व कृष्णपुरम कांद्याच्या निर्यातीसाठी फक्त चेन्नई बंदरावरून परवानगी देण्यात आली असून ३१ मार्च २०२१ निर्यात पूर्ण करण्याबाबत कळविले आहे. निर्यातकामी संबंधित निर्यातदाराला कर्नाटक सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. यासाठी प्रकार आणि प्रमाण प्रमाणित करावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर बेंगलोर येथील विदेश व्यापार महासंचालक कार्यालयात निर्यातदाराच्या माध्यमातून नोंद होईल. हे कार्यालय निर्यातीवर लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आहे. बंदरावर निर्यात होण्यापूर्वी सीमाशुल्क प्राधिकरण यांना फलोत्पादन संचालक व अतिरिक्त विदेश व्यापार महासंचालकांचे पत्र महत्वपूर्ण असणार आहे. 

कृष्णापुरम कांद्याची निर्यात करताना निर्यातदारांना आंध्र प्रदेश सरकारच्या सहाय्यक संचालक फलोत्पादन, कडप्पा यांचेकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्यानंतर कांदा निर्यातीच्या उद्देशाने प्रमाणित करण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची नोंदणी चेन्नई विभागीय अतिरिक्त महासंचालक यांच्याकडे नोंदणी करावी लागणार आहे. हे कार्यालय निर्यातीच्या कामकाजावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनंतर निर्यात प्रक्रियेसाठी आंध्र प्रदेश सरकारच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्राप्त प्रमाणपत्राच्या आधारे सीमाशुल्क प्राधिकरण त्यास निर्यातीसाठी परवानगी देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

कांदा निर्यातीवर अवलंबून
कर्नाटक मधील कोलार जिल्ह्यातील उत्पादित बेंगलोर रोझ व आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील कृष्णपुरम वाणाच्या कांद्याचे उत्पादन स्थानिक ठिकाणी मर्यादित प्रमाणावर घेतले जाते. मात्र काढणी पश्चात या कांद्याला स्थानिक बाजारपेठेत मागणी नसल्याने अडचणी येतात. प्रामुख्याने हा कांदा सिंगापूर, मलेशिया येथे लोणच्याच्या निर्मितीसाठी वापरला जात असल्याने सर्व गणित निर्यातीवर अवलंबून असते. त्यामुळे हा निर्णय येथील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.

  आमच्यावर अन्याय का ? 
महाराष्ट्राच्या कांद्यालाही निर्यातीची परवानगी देण्याची मागणी होत आहे. केंद्राने येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जो निर्यातीचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निर्यातीस परवानगी देऊन आम्हालाही दिलासा द्या, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.


इतर अॅग्रोमनी
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...
गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...