सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना ४९ गावांत परवानगी

सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत वाढीव लोकसंख्येमुळे आणखी ४९ गावांत रास्त भाव धान्य दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
 Permission for fair price shops in 49 villages in Solapur district
Permission for fair price shops in 49 villages in Solapur district

सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत वाढीव लोकसंख्येमुळे आणखी ४९ गावांत रास्त भाव धान्य दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. दुकानासाठी अर्ज करण्याची मुदत कार्यालयीन वेळेत २ नोव्हेंबर ते २ डिसेंबर आहे’’, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली. 

सध्याची रास्त भाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने तसेच ठेवून रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली आणि लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन दुकाने व किरकोळ  केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात आली आहेत.

सर्वात जास्त बार्शी तालुक्‍यात १४ , माळशिरसमध्ये १२ दुकाने मंजूर झाली आहेत. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांना अर्ज करता येईल. मंजूर दुकानांचे व्यवस्थापन महिला समुदायाद्वारे करणे आवश्‍यक आहे. 

     या गावात होणार रास्त धान्य दुकान  उत्तर सोलापूर : पाथरी, बीबी दारफळ  मोहोळ : बैरागवाडी, पासलेवाडी, शिंगोली, शिरापूर (मो),  अक्कलकोट : घोळसगाव, दुधनी, नन्हेगाव, कुरनूर माळशिरस : पानीव, घुलेनगर (पानीव), नातेपुते, फोंडशिरस, कुरबावी, कळबोळी, अकलूज दुकान नंबर ६४, श्रीपूर, गिरवी, भांबुर्डी, जाधववाडी, अकलूज दुकान नंबर ६९

सांगोला ः बंडगरवाडी (चिकमहूद) पंढरपूर ः सांगवी, पंढरपूर दुकान नंबर ५०/८४, चिंचुबे, नेपतगाव, तरटगाव, कासेगाव  बार्शी : आगळगाव, इर्ले, कोरगाव, चारे, चिंचोली, तावडी, भोईंजे, महागाव, नारी, बार्शी दुकान नंबर १६७, १७८, १८६, १९६, २००  माढा : आकुलगाव, बावी दुकान नंबर ३१६/०५, बावी दुकान नंबर ६२/८५  करमाळा : आळजापूर, नेरले, पोंधवडी, आवाटी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com