नगर : दिरंगाईमुळे २७ संस्थांच्या छावणीची परवानगी रद्द

चारा छावणी
चारा छावणी

नगर : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधन वाचविण्यासाठी मंजुरी मिळूनही आठ दिवसांत छावणी सुरू करण्यास काही संस्थांकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे पशुधनाची होणारी हेळसांड लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील २७ छावण्यांची परवानगी रद्द केली आहे. यात शेवगाव ७, पाथर्डी ५, नगर ७, श्रीगोंदे ३, पारनेर ५ अशा २७ संस्थांचा समावेश आहे.  यापूर्वीही छावणी सुरू करण्यास विलंब करणाऱ्या नऊ संस्थांची छावणीची परवानगी रद्द केली असून, एकूण ३६ संस्थांना दिरंगाईचा फटका बसल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून जिल्ह्यात २२६ छावण्या मंजूर करण्यात आल्या आहे. त्यातील प्रत्यक्षात ११३ छावण्या सुरू आहेत. त्यात ५३ हजार ९१३ लहान-मोठी जनावरे दाखल झाली आहेत. परंतु, काही संस्थांनी आठ दिवासांची मुदत उलटून गेल्यानंतरही चारा छावणी सुरू केली नाही. यामुळे संबंधित गावातील पशुधनाचा चाऱ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मंजुरी असल्याने त्या गावात इतर इच्छुक संस्थांना मान्यता देण्यातही अडथळा निर्माण झाला आहे.

तालुकानिहाय परवानगी रद्द झालेल्या संस्था पारनेर- राजमाता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था (पानोली), श्रीदत्त बहुउद्देशीय संस्था (जामगाव), संगमेश्‍वर मजूर सहकारी संस्था (पारनेर), शहीद अरुण बबनराव कुटे स्मृती प्रतिष्ठान (पारनेर), राजे वॉरियर्स प्रतिष्ठान (कडूस). पाथर्डी- मुंजोबा कला व क्रीडा प्रतिष्ठान (भालगाव), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला बहुउद्देशीय संस्था (खांडगाव), शिवतेज प्रतिष्ठान (शिरापूर), मांडवेश्‍वर ग्रामविकास प्रतिष्ठान (मांडवे), अकोला परिसर सह दूध उत्पादक संस्था (मोहज देवढे). नगर-कृषी उत्पन्न बाजार समिती (डोंगरगण), विविध कार्यकारी सेवा सोसायटी (सारोळा कासार), खडकी विकास सेवा सोसायटी (खडकी), सिद्धेश्‍वर सह दूध उत्पादक संस्था (देऊळगाव सिद्धी), कृषी उत्पन्न बाजार समिती (बुऱ्हाणनगर), कृषी उत्पन्न बाजार समिती (कापूरवाडी), विविध कार्यकारी सेवा सोसायटी (बाबुर्डी बेंद). श्रीगोंदे- कै. नवनाथ सार्वजनिक वाचनालय (कामठी), जगदंबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (घोगरगाव), जगदंबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था (रूईखेल). शेवगाव- भगवान बाबा बहुउद्देशीय संस्था (ढोरजळगावने), समर्थ ग्राम विकास क्रीडा मंडळ (आव्हाने बुद्रुक), जगदंबा देवी माता सेवा ट्रस्ट (शहापूर), यशवंत मजूर सहकारी संस्था (सामनगाव), ओम चैतन्य बहुउद्देशीय संस्था (आखेगाव तितर्फा), श्री शिवतीर्थ बहुउद्देशीय संस्था (गोळेगाव), वै. भक्तराज महाराज सार्वजनिक वाचनालय (चापडगाव- बेलगाव). तालुकानिहाय छावणीतील पशुधन     

नगर    ३५३४
पारनेर   ३००८
पाथर्डी  १७६५२
शेवगाव  ३३९६
कर्जत  ७५०९
जामखेड  १२२००
श्रीगोंदे    ६६१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com