agriculture news in Marathi permission important for agriculture weather variation research center Maharashtra | Agrowon

कृषी हवामान बदल संशोधन केंद्रस्थापनेस मंजुरीची गरज

माणिक रासवे
सोमवार, 23 मार्च 2020

बदल संशोधन केंद्र स्थापनेसाठी तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेला आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत तग धरू शकणारी पिके, फळपिके, भाजीपाला पिके यांवरील संशोधन कीड, रोग व्यवस्थापन तसेच हवामान सल्ला गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी परभणी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन होणे आवश्यक आहे. या केंद्राचा अन्य विभागांतील शेतकऱ्यांनादेखील फायदा होईल.
- डॉ. कैलास डाखोरे, मुख्य नोडल अधिकारी, ग्रामीण कृषी मोसम सेवा प्रकल्प, ‘वनामकृवि, परभणी

परभणी ः अतिवृष्टी, गारपीट आदी संकटांमुळे (अजैविक ताण) पिकांवर कीड, रोगाचा प्रादुर्भाव (जैविक ताण) आढळून येत आहे. हवामान बदलामुळे शेती व्यवसायापुढे विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. जिरायतीबहुल क्षेत्र असलेल्या मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत.

याचे संशोधन करून गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर हवामान सल्ला पोचविण्यासाठी सध्याची संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्य यंत्रणा अतिशय तोकडी आहे. त्यामुळे मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राची नितांत गरज लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु मराठवाड्यातील शेतकरी आणि शेती यांच्या हिताचा गांभीर्याने विचार केला जात नसल्यामुळे हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासन दरबारी हा पडून आहे.

सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात चार लहान कृषी हवामान प्रकल्प आहेत. त्यात हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेअंतर्गतच्या अखिल भारतीय कृषी हवामान समन्वित प्रकल्प आणि राष्ट्रीय संवेदनक्षम वातावरण बदल समरसता प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत अल्प प्रमाणात कृषी हवामान संशोधनाचे काम चालते.

भारतीय हवामान विभागाअंतर्गत दोन लहान कृषी हवामान संबंधित प्रकल्प सुरू आहेत. त्यात ग्रामीण कृषी हवामान सेवा आणि पीक उत्पादनाचा अंदाज वर्तविणे (फसल) यांचा समावेश आहे. ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाअंतर्गत ढोबळमानाने जिल्हा स्तरावर कृषी हवामान सल्ला दिला जातो. परंतु हा सल्ला मंडळ आणि गाव स्तरावर उपयोगाचा ठरत नाही. पीक प्रकल्पाअंतर्गत जिल्हा स्तरावर मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज काढला जातो. परंतु हा प्रकल्प गेल्या सात-आठ वर्षापासून प्रायोगिक स्थितीत सुरू आहे. 

मराठवाड्यातील शेतकरी आणि शेती व्यवसायाला संकटातून बाहेर काढण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामानशास्त्र विभागाच्या परभणी येथील वेधशाळेच्या परिसरात कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने आवश्यक तेवढ्या मनुष्यबळासह या कृषी हवामान संशोधन केंद्रास तत्काळ मंजुरी देण्याची गरज आहे.

कृषी हवामान बदल संशोधन केंद्राची उद्दिष्टे

 • मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर (तालुका-मंडळ) हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भू-हवामान वेधशाळा आणि स्वयंचलित हवामान वेधशाळा कार्यान्वित करणे
 • प्रत्येक जिल्ह्यातील हवामान, हवामानातील बदलांचा अभ्यास करणे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत सूक्ष्म वातावरणीय विभागवार अथवा स्थानिक पातळीवर (तालुका-मंडळ) पीक पद्धती विकसित करणे. दुष्काळप्रवण क्षेत्राचे निकष गावपातळीवर तपासणे, त्यांची नव्याने मांडणी करणे, आपत्कालीन पीक नियोजन सुचविणे, हवामान पीक कॅलेंडर तयार करणे.
 • मराठवाड्यातील स्थानिकरीत्या पाण्याचे बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन काढणे त्यावर आधारित मुख्य पिकांकरिता पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज काढणे, शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार पीक पाणी व्यवस्थापन वेळापत्रक देणे.
 • मराठवाड्यातील प्रत्येक गावात कृषी हवामान सल्ला पत्रिका पोचवणे.
 • बदलत्या हवामानात त्यात दुष्काळ, पावसाचा खंड, अतिवृष्टी, गारपीट, वादळ, धुके, तापमान, उष्णतेची लाट, थंडीची लाट या परिस्थितीत सहनशील पिकांच्या वाणाची चाचणी, शिफारस, नवीन वाणांची निर्मिती, पीक व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
 • कीड व रोग अनुमान प्रारुप काढणे, स्थानिक पातळीवर पीकनिहाय कीड व रोगाचे अनुमान काढणे, मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज देणे.
 • हवामान आधारित पीक, फळपीक विमा यासाठी उपयुक्त माहिती शासनास उपलब्ध करून देणे.
 • शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग यांना सूक्ष्म हवामान विभागानुसार मार्गदर्शन करून रोजगार निर्मितीसाठी हातभार लावणे.
 • धुके, गारपीट, पावसाचा खंड, उष्णतेची लाट, थंडीची लाट यांसारख्या नैसर्गिक संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी संशोधन, सयंत्रे उपलब्ध करून देणे.
 • वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, विस्तार कार्य करणे.
   

इतर अॅग्रो विशेष
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...
सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले...पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार...
कोरोनामुळे राज्यातील द्राक्ष बागेतच ‘...नाशिक/सांगली/सोलापूर: यंदाचा द्राक्ष हंगाम...
सागरी मार्गाने या देशांत निर्यातीसाठी...पुणे: युरोपला भारतातून विमानामार्गे होणारी...
दुधासाठी पाच रुपये अनुदान हवे पुणे: राज्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या...
विदर्भात आज गारपीटीचा इशारा पुणे : राज्याच्या विविध भागात पुर्वमोसमी पावसाने...
अडत्यांशिवाय पुणे बाजार समिती सुरु...पुणे : कोरोना विषाणू सारख्या आणीबाणी आणि...
लासलगाव येथे गोणी पद्धतीनुसार कांदा...नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या...
सर्व कर्जांच्या हफ्त्यांना तीन...मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण; एकूण...मुंबई : राज्यात कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : राज्यात सुरु असलेला पुर्वमोसमी पाऊस...
केळी उत्पादकांचे दररोज सहा कोटींचे...जळगाव : केळी वाहतुकीसह परराज्यातील...
जलतंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीची उंच...अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथील केशवराज...
गरिबांसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज:...नवी दिल्ली : कोरोना विषाणूने देशात थैमान घालायला...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी ‘एसएओ’कडे ‘...पुणे : राज्यातील महापालिका व नगरपालिका...
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी...मुंबई : सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा...
शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये...