...अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

सोलापूर, नगर आणि बीड जिल्ह्यात हैदोस घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश येत आहे. पण आता तो सापडल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत.
...अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश
...अखेर त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

सोलापूर ः सोलापूर, नगर आणि बीड जिल्ह्यात हैदोस घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश येत आहे. पण आता तो सापडल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. या आधी बीड, नगरमध्ये सहा जणांचा बळी घेतलेल्या या नरभक्षक बिबट्याने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात मोठी दहशत पसरवली आहे. गेल्याच आठवड्यात करमाळ्यात एका तरुण शेतकऱ्यासह महिलेचा या बिबट्याने जीव घेतला. त्यानंतर करमाळ्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात जायला शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे.   आतापर्यंत नगर जिल्ह्यातील तीन, आष्टी (बीड) तीन व सोलापूर जिल्ह्यात दोघांना बिबट्याने ठार मारले आहे. आष्टी (बीड), नगर जिल्ह्यातून तो बिबट्या पाच ते सहा दिवसांपूर्वी करमाळा तालुक्‍यात आल्याचं सांगण्यात येतं. गेल्या गुरुवारी (ता.४) लिंबेवाडी (ता. करमाळा) येथे उसाला पाणी देणारे कल्याण फुंदे या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. त्यानंतर दोनच दिवसांत पुन्हा शनिवारी (ता.६) अंजनडोह (ता. करमाळा) येथे लिंबूच्या बागेत लिंबू तोडणाऱ्या जयश्री शिंदे या महिला शेतकऱ्यावरही असाच हल्ला करत बिबट्याने त्यांचाही जीव घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर करमाळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी शेताकडे जायला धजावत नसल्याचे चित्र आहे.  दरम्यान, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी अंजनडोह, लिंबेवाडी, जिंती परिसरात दहा पिंजरे लावले आहेत. लवकरच ड्रोनच्या साह्यानेही बिबट्याचा शोध घेणार असल्याचे आणि सध्याची त्याबाबतची भीती लक्षात घेऊन त्याला ठार मारण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com