agriculture news in Marathi permission for maize procurement Maharashtra | Agrowon

मका खरेदीला मंजुरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली मका खरेदीची मागणी मान्य झाली असून, राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीस सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बुलडाणा ः गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली मका खरेदीची मागणी मान्य झाली असून, राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदीस सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंत्रणांना ही खरेदी ३० जूनपर्यंत संपवावी लागणार आहे. जिल्ह्यात ६० हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून १४ केंद्रांवरून ही खरेदी प्रक्रिया राबविण्यास मंजुरीही देण्यात आल्याचे समजते. 

गेल्या अनेक दिवसांपासून मका खरेदी सुरू करण्याची मागणी केली जात होती. राज्यात मका विक्रीसाठी हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात आठ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे. परंतु आजवर खरेदीचे आदेश नसल्याने अडचणी येत होत्या. त्यातच बाजारात मक्याचा दर अवघा ११०० ते १४०० पर्यंत होता. वास्तविक हा दर १८५० या आधारभूत किमतीपेक्षा बराच कमी होता. हंगाम तोंडावर आल्याने पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांना मका विक्रीची लगबग लागलेली होती. त्यामुळे तातडीने मका खरेदी सुरू करण्याची मागणी केली जात होती. 

आता भारतीय अन्न महामंडळ या नोडल एजन्सीद्वारे ही खरेदी प्रक्रिया राबविण्यास ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात केंद्र शासनाची ‘नोडल एजन्सी’ म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहणार असून, प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया बिगर आदिवासी क्षेत्रात ‘महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन मुंबई’ व आदिवासी क्षेत्रात ‘आदिवासी विकास महामंडळ नाशिक’ या संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. 

जिल्ह्याला ६० हजार 
क्विंटलचे उद्दिष्ट 
या हंगामात उत्पादित झालेला ६० हजार क्विंटल मका आधारभूत किमतीने खरेदी केला जाणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तालुकास्तरावर १४ केंद्रांवर ही खरेदी प्रक्रिया राबवली जाईल. या खरेदीस पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समन्वय समितीने मंजुरी दिली आहे. खरेदीचे आदेशही प्रशासनाने काढले आहेत. जिल्ह्यात सुमारे ८४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. या शेतकऱ्यांचा ६० हजार क्विंटल मका शासनाकडून घेतल्या जाईल. 

--------------- 
प्रतिक्रिया 
मका खरेदीचे आदेश आलेले असून जिल्हास्तरावरूनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्याकडून खरेदीबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार १४ केंद्रावर ही खरेदी तातडीने सुरू केली जात आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका १८५० रुपये एवढ्या हमीदराने खरेदी केला जाईल. 
- पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...