आंबे पिकविण्यासाठी 'इथेफॉन'ला परवानगी

आंबे
आंबे

पुणे: आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून 'इथेफॉन' या घटकाचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला. आंबा हंगाम सुरू झाल्यानंतर बाजार समितीमधील अडते असोसिएशनची एफडीएने बैठक घेतली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. सहायक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी उल्हास इंगवले, रमाकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, सचिव रोहन उरसळ आदी पदाधिकारी व्यापारी उपस्थित होते. दिल्लीच्या भारतीय अन्नसुरक्षा मानके (एफएसएसएआय) यांच्याकडे इथेफॉन हे फळ पिकविण्यासाठी वापरण्यात यावे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. त्यावर संशोधन व तपास करून यावर्षी हा घटक वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. या घटकाचा वापर करताना ती फळाच्या प्रत्यक्षात संपर्कात न आणता एका आवरणात (पॅक) करून ते आंबा पिकविण्यासाठी ठेवता येईल. त्याशिवाय नैसर्गिकरीत्या आंबे पिकविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केल्या.

व्यापारी अथवा आंबा विक्रेत्यांकडून आंबा किंवा इतर फळे पिकविताना कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. तसे आढळल्यास नागरिकांसह व्यापाऱ्यांनी याबाबत शंका आल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२३६५ येथे तक्रार करावी, असे आवाहन एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com