agriculture news in Marathi permission for POCRA scheme Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ घटकांना मिळणार पूर्वसंमती

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (पोकरा) वैयक्तिक लाभाच्या घटकांना पूर्वसंमती स्थगित करण्यात आली होती. 

नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या निर्देशानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत (पोकरा) वैयक्तिक लाभाच्या घटकांना पूर्वसंमती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर शेतीशाळा आणि बीजोत्पादन या घटकांना पूर्वसंमती देण्यात आली. यानंतर कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशानुसार वैयक्तिक लाभा घटकांच्या पूर्वसंमतीची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्राव्दारे सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सोमवारी (ता. १४) दिले आहेत. 

‘पोकरा’ची अंमलबजावणी राज्यातील १५ जिल्ह्यांमधील पाच हजार १४२ गावांत सहा वर्षांच्या कालावधीत (२०१८-१९ ते २०२३-२४ पर्यंत) राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे सर्वांगीण उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रकल्पातील सर्व घटक राबविण्यास असलेला वाव विचारात घेऊन सर्व गावसमुहामध्ये प्रकल्प घटकांची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान कोवीड - १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांना पूर्वसंमती स्थगित करण्यात आली होती. यानंतर २० ऑगस्टपासून शेतीशाळा आणि बीजोत्पादन या दोन घटकांसाठी पूर्वसंमती देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच जिल्ह्यांच्या प्रकल्प आढावा बैठकीत वैयक्तिक घटकांच्या पूर्वसंमतीची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार प्रकल्प गावातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जावर मार्गदर्शक सूचनांनुसार घटकनिहाय कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी सोमवारी (ता. १४) सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात २०१९-२० साठीचा शिल्लक लक्षांक आणि २०२०-२१ चा लक्षांक एकत्रित करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. वैयक्तिक घटकात यात मात्र शेळीपालन बाब स्थगित असल्याने या बाबीचे अर्ज लाभार्थ्यांनाकडे परत करण्याचे सूचना दिल्या आहेत.

या घटकांना मिळणार पूर्वसंमती
फळबाग लागवड, वृक्ष लागवड व बांबू लागवड, गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोष्ट उत्पादन युनिट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, वैयक्तिक शेततळे (सर्व प्रकारचे) व शेततळे अस्तरीकरण, खारपाण पट्यातील गावांमध्ये वैयक्तिक शेततळे (सर्व प्रकारचे), विहिरीचे पुनर्भरण, ठिबक व तुषार सिंचन संच, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन करणे, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट हाऊसमधील भाजीपाला व फुलपिकांचे लागवड साहित्य, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, पंपसंच, पाइप व यांत्रिकीकरण, नवीन विहीर घेणे या बाबींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया
‘पोकरा’तंर्गत वैयक्तिक घटकांना मंजुरी बंद केल्यामुळे आम्हाला योजनेचा लाभ मिळत नव्हता. आता लाभ मिळेल, असे कळविल्यामुळे समाधान वाटत आहे.
- माधव वडजे, शेतकरी, उंद्री (पदे) ता. मुखेड जि. नांदेड.

वैयक्तिक घटकातंर्गत ज्यांनी अर्ज केले आहेत, अशांना कृषी ग्राम समितीच्या मंजुरीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. यावेळी काही घटकात लक्षणांकानुसार घटकांना मंजुरी देण्यात येणार आहे. मागील लक्षांक व चालू वर्षाचे लक्षांक यामुळे वैयक्तिक घटकांना लाभ मिळेल.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...