agriculture news in Marathi permission for rahuri university soybean variety Maharashtra | Agrowon

राहुरी कृषी विद्यापीठाचा सोयाबीन वाण प्रसारित 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले ‘केडीएस-९९२’ हा सोयाबीन वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे.

नगर ः राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले ‘केडीएस-९९२’ हा सोयाबीन वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा व आंध्र प्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. 

राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने उत्पादनात वाढ व्हावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने सोयाबीन वानावर संशोधन करून ‘केडीएस-९९२’ हा वाण विकसित केला आहे. आतापर्यंत राज्यात १५ पेक्षा जास्त वाण आहेत. कृषी संशोधन केंद्राचे संशोधक व सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांच्यासह सहकाऱ्यांनी साधारण आठ ते दहा वर्षे संशोधन करून ‘केडीएस-९९२’ हा वाण सोयाबीन वाण विकसित केला आहे. 

केंद्रीय सोयाबीन वाण ओळख व प्रसार समितीची बैठक नुकतीच इंदोर येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. टी. आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सोयाबीन संशोधन संस्था, इंदोरच्या संचालक डॉ. नीता खांडेकर, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव गुप्ता व इतर मान्यवर सदस्य या वेळी उपस्थित होते. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कसबे डिग्रज कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कटमाळे, सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले आहे. 

प्रसारित वाणाचे वैशिष्ट्य 

  • ‘केडीएस-९९२’ या सोयाबीन वाणाची उत्पादकता ६ क्विंटल अधिक आहे. 
  • हा वाण दक्षिण भारतात पाने खाणार्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील, तर तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 
  • या वाणाचे दाणे मोठ्या आकाराचे असून, १०० ते १०५ दिवसांत हा वाण पक्व होतो. 
  • बदलत्या वातावरणावर काही अंशी मात करणारा हा वाण आहे. 
  • मल्टी पल्पर सीड (दाण्यावरील ठिपके) या रोगालाही काही प्रमाणात हा वाण प्रतिकार,करतो. 

प्रतिक्रिया
देशात व राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्पादन वाढ आणि बदलत्या वातावरणावर मात करण्याच्या दृष्टीने ‘केडीएस-९९२’ हा सोयाबीन वान विकसित केला आहे. आठ ते दहा वर्षे त्यावर संशोधन केले. पाच राज्यात लागवडीसाठी शिफारस झाली आहे. 
- डॉ. मिलिंद देशमुख, सोयाबीन पैदासकार, कसबे डिग्रज, जि. सांगली 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...