agriculture news in Marathi Permission required of CIB for drone pesticide praying Maharashtra | Agrowon

एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 जानेवारी 2020

एरियल फवारणीच्या दुष्परिणामाबाबत आम्ही ‘सीआयबी’ला पत्र लिहिले. त्यावर उत्तर देताना कायद्यानुसार ‘सीआयबी’च्या परवानगीची गरज असल्याचे कळविण्यात आले. परंतु, आजवर देशातील एकाही संस्था किंवा कंपनीकडून चाचणीकामी ‘सीआयबी’ची परवानगी घेण्यात आलेली नाही, असेही ‘सीआयबी’ने म्हटले आहे. त्यावरूनच आजवर झालेल्या चाचण्या अवैध आहेत.
- नरसिंहा रेड्डी, संचालक, पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडिया

नागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी सेंट्रल इन्सकेटीसाईड बोर्डाची (‘सिआयबी’) परवानगी गरजेची आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत कोणालाही अशाप्रकारच्या फवारणीची परवानगीच देण्यात आली नसल्याचे ‘सीआयबी’ने कळविले आहे. त्यामुळे राज्यासह देशात ड्रोन फवारणीचे प्रयोग अवैधरित्या झाल्याचा आरोप पॅन इंडियाकडून करण्यात आला आहे. 

पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाव्दारे ‘सीआयबी’कडे कीडनाशक कायद्यातील कोणत्या तरतुदीच्या आधारे एरियल फवारणीस मान्यता देण्यात येते, याबाबत विचारणा करण्यात आली होती. पेस्टीसाईड ॲक्‍शन नेटवर्क इंडियाचे हैदराबाद येथील संचालक नरसिंम्हा रेड्डी यांनी तसे लेखी पत्रच ‘सीआयबी’ला दिले होते.

यामध्ये ड्रोन किंवा एरियल फवारणीव्दारे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास या संदर्भाने देखील मुद्दे मांडण्यात आले आहेत. ड्रोन फवारणीच्यावेळी हवेतून कीडनाशकाची मात्रा वातावरणात पसरत त्याव्दारे पर्यावरणातील इतर सजीवांनाही नुकसान होण्याची शक्‍यता वर्तविण्यता आली आहे. त्यासोबच मित्रकिडीदेखील मारल्या गेल्यामुळे पर्यावरणाचा असमतोल निर्माण होण्याचेही नमूद होते. 

‘सीआयबी’ला लिहिलेल्या या पत्रात इतरही अनेक तांत्रिक बाबी मांडण्यात आल्या आहेत. केरळमधील एका गावात एन्डोसल्फानच्या एरिअल फवारणीमुळे झालेले दुष्परिणामही या संदर्भाने पॅन इंडियाने अभ्यासलाचा दावा करण्यात आला आहे. किडनाशकाचे अंश इतरत्र पसरत असल्याने त्यामुळेही अनेक धोके संभवत असल्याचे पॅन इंडियाने म्हटले आहे.

अन्न आणि पाण्यातही कीडनाशकाचे अंश यामुळे मिसळतात. त्यासोबतच हवाही प्रदूषित होण्याचा धोका आहे. पंपाव्दारे फवारणी करताना एकच व्यक्‍ती कीडनाशकाच्या संपर्कात येतो. ड्रोनने फवारणी मात्र अनेकांना अनेक प्रकारचे धोके संभवतात.

कीडनाशक कायद्यात तरतूद नाही
पॅन इंडियाने एरियल फवारणीला कीडनाशक कायद्यातच परवानगी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणत्या तरतुदीनुसार एरियल फवारणीला मान्यता दिली गेली, अशी विचारणा केली आहे. त्यासोबतच कृषी संशोधक संस्थास्तरावर देखील या संदर्भाने कोणत्याच चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ड्रोनने फवारणीबाबत परवानगी संदर्भाने गांभीर्य जपण्यात यावे, अशी मागणीही पॅन इंडिया कडून करण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली;...नवी दिल्ली : चार महिन्यापूर्वी कांद्यावर...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...