agriculture news in Marathi permission for transaction for DCC banks Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास मान्यता

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकार किंवा महामंडळाच्या ठेवी तसेच वेतन आदी बँकिंग व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेत करण्यास घालण्यात आलेली बंदी राज्य सरकारने बुधवारी (ता. ८) उठविली.

मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकार किंवा महामंडळाच्या ठेवी तसेच वेतन आदी बँकिंग व्यवहार जिल्हा मध्यवर्ती बँकेत करण्यास घालण्यात आलेली बंदी राज्य सरकारने बुधवारी (ता. ८) उठविली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी तसेच निम सरकारी संस्था, महामंडळांचे सर्व बँकिंग व्यवहार केवळ सरकारची मालकी असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयाचा फटका जिल्हा मध्यवर्ती बँकांना बसला होता. या बँकांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, शिक्षकांचे वेतन तसेच महामंडळांच्या ठेवी असतात.

आता अ वर्ग असलेल्या तसेच आर्थिकदृष्ट्र्या सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पुन्हा शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतन तसेच सार्वजनिक उपक्रम/महामंडळ याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मान्यता देण्यात आली असून, वेतनाबाबत मात्र या बँकांना सरकारशी करार करावा लागणार आहे.

त्याचप्रमाणे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भागभांडवलामध्ये भारत सरकारचे ५० टक्के व राज्य शासनाचा १५ टक्के हिस्सा आहे. राज्यात बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयीकृत बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कर्ता बँक आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक या दोन बँकांनाही सरकारी बँकिंग व्यवहारास मान्यता देण्यात आली. तर आयडीबीआयचे ४६.४६ टक्के भागभांडवल भारत सरकारच्या मालकीचे असून भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे या बँकेचे ५१ टक्के भागभांडवल आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ हे सरकारच्या मालकीचे असल्यामुळे आयडीबीआय बँकेसही शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आयडीबीआय, ग्रामीण बॅंकेतही व्यवहारास मान्यता
आत्तापर्यंत केवळ राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच व्यवहार करण्याचे बंधन शिथिल केले. आता मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय बँक या बँकांमध्येही शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.


इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....