agriculture news in Marathi, permission for vice director office in Aurangabad , Maharashtra | Agrowon

औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला अखेर मान्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

​रेशीम कोषाला अनुदान, मराठवाड्यात उपसंचालक कार्यालय देण्याच्या आश्वासनाची पूर्ती झाली. आर्थिक उन्नतीची प्रचंड क्षमता असलेल्या रेशीम उद्योगाकडे जास्त पाणी लागणारा ऊस उत्पादक शेतकरी वळेल अशी आशा आहे. विविध विषय, शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने मार्गी लावण्यास कार्यालयाची मदत होईल.
- अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग राज्यमंत्री 

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे नागपूर येथील मुख्यालयातील उपसंचालक (तुती) हे पद औरंगाबाद येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयात स्थलांतरित करण्याला शासनाने मान्यता दिली आहे. बुधवारी (ता. १८) या संबंधीचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथे झालेल्या रेशीम दिन कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली होती. 

औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यांत रेशीम उद्योगाला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. राज्यात एकूण १९७८३ एकरवर तुतीचे क्षेत्र आहे. त्यापैकी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यात ११३७३ एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक आहे. त्या अनुषंगाने या विभागात रेशीम उद्योगासाठी पायाभूत सुविधा लक्षात घेता औरंगाबाद येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे मजबुतीकरण करून या विभागात उपसंचालक पदावरील प्रादेशिक अधिकारी नियुक्‍त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ज्या भागात रेशीम उद्योगाखालील क्षेत्र कमी आहे. अशा भागातील रेशीम कर्मचारी हे ज्या भागात क्षेत्र जास्त आहे, त्या क्षेत्रात स्थलांतरित करून प्रशासकीय कामकाज पार पाडणे व्यावहारिक असल्याची बाब शासन निर्णयासाठी विचारात घेण्यात आली. 

औरंगाबाद विभागात उपसंचालक स्वतंत्र रेशीम कार्यालय सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावावर संचालक (रेशीम) यांनी ३० ऑगस्ट २०१९ च्या पत्राद्वारे त्यांचा अभिप्राय सादर केला होता. औरंगाबाद विभागात स्वतंत्र रेशीम कार्यालय सुरू करण्यासाठी राजपत्रित, अराजपत्रित मिळून १२ पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव रेशीम संचालनालयाने सादर केला होता. शिवाय वस्त्रोद्योग धोरणांतर्गत राज्यात वस्त्रोद्योग आयुक्तालयांतर्गत रेशीम संचालनालयाचा समावेश करून त्यासाठीचा एकत्रित आकृतिबंध तयार करण्याची बाब स्वतंत्रपणे विचाराधीन असल्याचे शासन आदेशात नमूद आहे.

नागपूर येथील रेशीम संचालनालयातील उपसंचालक (तुती) हे पद औरंगाबाद येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयात स्थलांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली. शिवाय सहायक संचालक प्रादेशिक रेशीम कार्यालय औरंगाबाद हे पद रेशीम संचालनालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात यावे, सोबतच या पदाला यापुढे सहायक संचालक (तुती) असे ओळखण्याचेही शासन आदेशात नमूद आहे. 

या शासन निर्णयामुळे  मराठवाड्यात सहायक संचालक (रेशीम) या पदावर उत्तम कामगिरी केलेले दिलीप हाके पुन्हा उपसंचालक (तुती)या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आले असून, औरंगाबादच्या सहायक संचालकपदी नियुक्‍ती मिळालेले एम. बी. ढवळे यांना नागपूर येथे रुजू होण्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद सहायक संचालक कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यापुढे उपसंचालक औरंगाबाद यांच्या अधिनस्त कार्यरत राहतील. तर रेशीम संचालनालयातील रेशीम उपसंचालक (तुती) यांच्या अधिनस्त सर्व कर्मचारी यापुढे सहायक संचालक (तुती) यांच्या अधिनस्त काम पाहतील असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया

तातडीने निर्णय घेतला याचा आनंद आहे. यामुळे तुतीचा क्षेत्रविस्तार व शेतकऱ्यांच्या योजना, प्रकल्प जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होईल. 
- विजय अण्णा बोराडे, विश्वस्त मराठवाडा शेती साह्य मंडळ. 

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना गती मिळून अंडीपुंज निर्मिती केंद्र, स्टोरेज, शेतकरी प्रशिक्षण केंद्र, रेशीम हब आदी भविष्यातील योजनांविषयीची काम गतीने होतील. 
- दीपक बुनगे, रेशीम कोष उत्पादक, रामगव्हाण, जि. जालना.
 

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...