Agriculture news in Marathi Personal claims should be settled expeditiously: Jhirwal | Agrowon

वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा व्हावा ः झिरवाळ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती स्तरावर निकाषांची पूर्तता करून जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या आहेत. 

नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती स्तरावर निकाषांची पूर्तता करून जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत श्री. झिरवाळ बोलत होते. या बैठकीस आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार, माणिकराव कोकोटे, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, आमदार किरण लहामटे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, अपर आयुक्त आदिवासी विभाग गिरीश सरोदे, मुख्य वनसंरक्षक नितीन बुधगे, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, राजूरचे प्रकल्प अधिकारी राजूर संतोष ठुबे, कळवण प्रकल्प अधिकारी विकास मीना उपस्थित होते. 

श्री. झिरवाळ या वेळी म्हणाले, की वनपट्टेधारकांच्या दावे पूर्तता करण्यासाठी तालुका स्तरावरील समितीकडून दावे पूर्ततेस आवश्यक असलेले तीन पुरावे दावेदारांना उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. वनअधिकारी यांनी सदर प्रकरणांतील जुने दस्तावेज तपासून आवश्यक पुरावे उपलब्ध करून प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होईल यादृष्टीने नियोजन करावे.

 ‘शिक्षणमित्र’ संकल्पनेतून शिक्षणाला गती 
कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने ‘एक गाव एक शिक्षणमित्र’अशी संकल्पना आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात शिक्षणमित्राची मानधन तत्त्वावर नियुक्ती करून, दुर्गम, आदिवासी भागांत शैक्षणिक गंगा पोहोचविण्याचे काम आदिवासी विभागातर्फे करण्यात येत आहे. तसेच आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना वाटप होणारे अन्नधान्यसुद्धा विद्यार्थ्यांना घरपोच पोहोचविले जाणार असल्याचेही श्री. सोनवणे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...
उजनीतून खरिपासाठी पहिले आवर्तन सोडणारसोलापूर ः उजनी धरणात आतापर्यंत उपयुक्त पाणीसाठा...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
कृषी सल्ला : दापोली विभागपावसाच्या पाण्यामुळे फवारणी केलेले कीटकनाशक किंवा...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...