राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपये

जळगाव :ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२६) पेरूची १४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये असा मिळाला.
Peru in the state 300 to 3500 rupees
Peru in the state 300 to 3500 rupees

जळगावात २५०० ते ३५०० रुपये दर

जळगाव : ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२६) पेरूची १४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये असा मिळाला. 

आवक पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, सिल्लोड, जालना आदी भागातून होत आहे. आवक याच आठवड्यात वाढली आहे. उठाव असल्याने सध्या दर स्थिर आहेत. नोव्हेंबरच्या सुरवातीला आवक कमी होती. 

परभणीत ३०० ते ५०० रुपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.२६) पेरूची ८० क्विंटल आवक झाली. पेरूला प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ५०० रुपये, तर सरासरी ४०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. गेल्या महिनाभरातील  प्रत्येक गुरुवारी पेरूची ३० ते ८० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ८०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.२६) पेरूची ८० क्विंटल आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते ३० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

कोल्हापुरात २००० ते ३००० रुपये क्विंटल

कोल्हापूर : येथील बाजार समितीत डागास २०० ते ५०० रुपये, तर क्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत दररोज ६०० ते ७०० डागांची आवक होत आहे. 

बाजार समितीत शिरोळ तालुक्याबरोबरच सातारा  भागातूनही पेरूची आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पेरूचे दर स्थिर आहेत. पंधरवड्यापूर्वी पेरूची आवक ४०० डागापर्यंत होती. त्यात थोडी वाढ झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादेत सरासरी ९०० रुपये क्विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.२६) पेरूची १८ क्‍विंटल आवक झाली. या पेरूला सरासरी ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २० नोव्हेंबरला ३१ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचे सरासरी दर ६०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. २१ नोव्हेंबरला २५ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला सरासरी ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

२२ नोव्हेंबरला २२ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचे सरासरी दर ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २३ नोव्हेंबरला पेरूची आवक २४ क्‍विंटल, तर सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

२४ नोव्हेंबरला २५ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचा सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २५ नोव्हेंबरला १२ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूला सरासरी ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये १००० ते १७५० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२४) पेरूची आवक २९ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १७५०, तर सर्वसाधारण दर १२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या बाजार समितीमध्ये फळांमध्ये पेरूची आवक कमी आहे. आवक कमी होत असली तरी मागणीनुसार दर मिळत आहेत. सोमवारी (ता.२३) पेरूची आवक ६१ क्विंटल झाली. त्यास १००० ते २२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १६७५ होता. रविवारी (ता.२२) आवक ३० क्विंटल झाली. त्यावेळी ६५० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ११२५ होता.

शनिवारी (ता.२१) पेरूची आवक ८१ क्विंटल झाली. त्यास ११२५ ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० होता. शुक्रवारी (ता.२०) आवक ३४ क्विंटल झाली. त्यावेळी ५०० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होता.

गुरुवारी (ता.१९) पेरूची आवक ११० क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत पेरूची आवक सर्वसाधारण होती. आवकेच्या तुलनेत दरात चढ- उतार दिसून येत आहे.

अकोल्यात ६०० ते १००० रुपये

अकोला : सध्या पेरूचा हंगाम जोरावर आहे. अकोल्यात दिवसाला चारशे ते पाचशे क्रेट (एक क्रेट २० ते २२ किलो) आवक होत आहे. गुरुवारी येथे ६०० ते १००० रुपये क्विंटल दराने पेरूची विक्री झाली.

दिवाळीच्या आधीपासून पेरूचा हंगाम जोरावर आहे. यंदा ग्राहंकामधून पेरूची मागणी कमी प्रमाणात आहे. तुलनेने आवक अधिक होत असल्याने मालाचा उठाव कमी आहे. यामुळे पेरूच्या दरांवर परिणाम झाला. पेरू सध्या अवघ्या सहाशे रुपयांपासून विकत आहे. चांगल्या दर्जाच्या पेरूला हजार रुपयांचा प्रतिक्विंटलला दर भेटत असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. 

बाजारात पेरूची किरकोळ विक्री २० ते ३० रुपये किलोने केली जात आहे. गेल्या आठवडाभरात पेरूच्या दरात घसरण झाली आहे. त्यातच थंडीचा जोर वाढल्याने मागणीतही घट असल्याचे बाजारपेठेत दिसून येते.

नांदेडमध्ये ५०० ते १००० रुपये

नांदेड  : कोरोना संसर्गामुळे शहरात पेरू विक्री करणाऱ्या हातगाड्यांना प्रतिबंध केला आहे. त्यामुळे येथील पेरू दरात मोठी घसरण झाल्याची माहिती व्यापारी मोहम्मद जावेद यांनी दिली.

सध्या सहा ते सात टन दररोज पेरूची आवक होते. त्यास पाचशे ते हजार रुपये दर मिळत आहे. तर, व्हीएनआर जातीचा पेरू दोन ते तीन हजार रुपये क्विंटलने विकत असल्याची माहिती मिळाली. 

नांदेड शहरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्ते तसेच विविध चौकात हातगाडे उभे करण्यास प्रतिबंध केला आहे. पेरूच्या सेवनाने सर्दी होईल, अशी भीती घातली जात आहे. त्यामुळे विक्रीही कमी आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या पाच ते सहा टन पेरूची आवक नांदेडला होत आहे. परतवाडा, लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यासह स्थानिक शेतकऱ्यांचाही पेरू बाजारात येत आहे, अशी माहिती मिळाली.

सोलापुरात १००० ते ३००० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पेरूची आवक तुलनेने कमी आहे. पण, दर काहीसे स्थिर आहेत. पेरूला प्रतिकिलोला किमान १० रुपये, सरासरी २० रुपये, तर कमाल ३० रुपये असा दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात पेरूची आवक रोज राहिली नाही. एक-दोन दिवसाआड अशीच राहिली. पण, पेरूला फारसा उठाव नसल्याने दर काहीसे स्थिर आहेत. पेरूला प्रतिकिलोला किमान १० रुपये, सरासरी २० रुपये आणि सर्वाधिक ३० रुपये असा दर आहे.

या आधीच्या सप्ताहातही आवक अशीच एक-दोन दिवसाआड एखआदी गाडी अशी राहिली. तर पेरूला दर किमान १५ रुपये, सरासरी २० रुपये आणि सर्वाधिक ३५ रुपये असा राहिला. 

पंधरवड्यापूर्वीही पेरूचा दर प्रतिकिलोचा दर किमान १० रुपये, सरासरी २२ रुपये आणि सर्वाधिक ३० रुपये असा मिळाला. काही किरकोळ चढ-उतार वगळता दर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com