राहता तालुक्यात चुकीची माहिती देऊन पेरूचा पीकविमा नाकारला

राहता तालुक्यात चुकीची माहिती देऊन पेरूचा पीकविमा नाकारला
राहता तालुक्यात चुकीची माहिती देऊन पेरूचा पीकविमा नाकारला

नगर : हवामान आधारित पीकविमा योजनेंतर्गत परू पिकांचा पीकविमा उतरविणारे जिल्ह्यामधील अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहेत. विमा कंपन्यांनी चुकीची माहिती देऊन पीकविमा नाकारला आहे, अशी तक्रार अखिल भारतीय पेरू उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड. विनायक दंडवते व सचिव सदाशिव रोहम यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे निवेदन देऊन केली. वंचित शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

निवेदनानुसार, केंद्र व राज्य सरकारची हवामान आधारित फळपीक योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. मात्र, पीकविमा कंपनीकडून दरवर्षी चुकीची व खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना पीकविमा नाकारून लाभापासून वंचित ठेवले जात आहे. जिल्ह्यातील राहता तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून पेरू उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

२०१९ मध्ये हवामान आधारित फळ पीकविमा योजनेतून राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा हप्ता भरला होता. १५ जून ते १४ जुलै दरम्यान ७६ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास प्रतिहेक्‍टरी अकरा हजार रुपये, ७६ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यास हेक्‍टरी २७ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई मिळेल, असे पीकविमा भरताना निकष सांगितले होते.

त्या निकषांनुसार राहता तालुक्यात एकूण १२ शेतकऱ्यांनी १२,१२२ हेक्टर पेरू पिकांचा विमा भरला. हप्त्यापोटी ३० लाख ८५ हजार रुपये इतकी रक्कम जमा केली. मात्र, तालुक्यातील इतर मंडळांतील पावसाची आकडेवारी दाखविली. तीन महसूल मंडळांत कमी पाऊस झालेला असतानाही जादा पाऊस झाल्याचे दाखविले. विमा कंपनीने विमा नाकारून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. 

पीकविम्याची चौकशी करा

ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असताना विमा कंपन्या पैसे कमविण्यासाठी शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ करतात. राहाता तालुक्यातील पेरूच्या पीकविम्याची चौकशी करून, पीकविमा मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com