agriculture news in Marathi pest and disease attack on crops Maharashtra | Agrowon

पिकांवर कीड, रोगांचा वाढणार प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जानेवारी 2021

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे. अशा बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके तसेच फळबागांमध्ये कीड,रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे. अशा बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके तसेच फळबागांमध्ये कीड,रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावाची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलेला आहे.

बदलत्या वातावरणाचा परिणाम 
हरभरा 

पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हलका पाऊस पिकाला फायदेशीर राहील, शेतात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. 
गहू 
ढगाळ हवामान ५ ते ६ दिवस राहिल्यास मावा कीड आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. उशिरा लागवड झालेल्या ठिकाणी शेंडे माशीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. सध्याच्या काळात थंडी कमी झाल्यामुळे पिकाची वाढ मंदावण्याची शक्यता आहे. 
करडई 
ढगाळ वातावरणामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. 
तूर 
बहुतांश ठिकाणी शेंगा पक्व झालेल्या आहेत. परंतु उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी प्रतिकूल वातावरणामुळे शेंग माशी, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. 
कांदा 
सातत्याने ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस झाल्याने करपा रोगाच्या प्रसार वाढेल. 
भाजीपाला 
५ ते ६ दिवस ढगाळ हवामान राहिले तर टोमॅटो, बटाटा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. 
वेलवर्गीय भाजीपाला पिकात डाऊनीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. 
हापूस आंबा
बहुतांश बागांच्यामध्ये मोहोर फुटलेला आहे. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिले तर तुडतुडे कीड, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव होईल. 
केसर आंबा
सध्या मोहोर बाहेर पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा विभागात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील होत आहे. अशा हवामानामध्ये भुरी आणि तुडतुड्याच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस जास्त दिवस राहिला तर मोहोराची गळ होण्याची शक्यता आहे. 
काजू 
सध्याच्या तापमानातील चढउतारामुळे मोहाराच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
लिंबूवर्गीय फळपिके 
 ज्या बागांच्यामध्ये पुरेसा ताण बसलेला नाही तेथे पाऊस झालेला असेल तर नवीन नवती निघेल. परंतु जेथे पुरेसा ताण बसलेला आहे. तेथे पुढील काळात चांगला फुलोरा येईल. ढगाळ वातावरण टिकून राहिले तर पांढरी माशी, कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 
डाळिंब 
ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणासाठी फवारणी करावी. 
केळी 
ज्या बागेत सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, तेथे ढगाळ वातावरणामुळे आणखी प्रसार होऊ शकतो. परंतु ज्या बागांचे व्यवस्थापन चांगले आहे, तेथे सध्याच्या वातावरणाचा फारसा परिणाम होणार नाही. 
द्राक्ष  
पाऊस जास्त झालेल्या बागांमध्ये मणी तडकण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच जिथे पाऊस झाला असून, बागेत पूर्वीपासून डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू आहेत, अशा ठिकाणी डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढू शकतो. जिथे सलग काही दिवस ढगाळ वातावरण आहे, अशा ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...