agriculture news in Marathi pest attack fear on grapes Maharashtra | Agrowon

पावसामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांची भीती

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

गेले काही दिवस खंड दिल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला माघार घेण्यासाठी पोषक  वातावरण तयार आहे. त्यामुळे द्राक्ष पट्ट्यात शुक्रवारी पाऊस पडल्यानंतर अनेक भागात प्रतिकूल वातावरण.

नाशिक : गेले काही दिवस खंड दिल्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला माघार घेण्यासाठी पोषक  वातावरण तयार आहे. त्यामुळे द्राक्ष पट्ट्यात शुक्रवारी पाऊस पडल्यानंतर अनेक भागात प्रतिकूल वातावरण. सध्या द्राक्ष हंगामाच्या कामकाजाला गती येत असताना झालेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांची भीती निर्माण झाली आहे.

गत काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील वर्षी मॉन्सूनोत्तर पावसासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. त्यातच पुढे मोठ्या कष्टातून पीक संरक्षणावर भरमसाठ खर्च झाल्यानंतर ऐन काढणीच्या हंगामात कोरोनामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. त्यात गत महिन्यात सततच्या पावसामुळे हंगामाचे कामकाज पुढे जात असताना हा पाऊस अडचणींचा ठरणार असल्याचे चित्र आहे.

चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामात अनेक शेतकऱ्यांकडे भांडवल नसताना शेतकरी पदरमोड करून, कर्ज घेऊन द्राक्ष बागा उभ्या करत आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने निफाड, चांदवड, दिंडोरी व नाशिक तालुक्यांमध्ये द्राक्ष छाटण्या सुरू झाल्या आहेत. तर, सप्टेंबर अखेरीस बहार छाटण्या झालेल्या काही  बागा पोंगा व फुलोरा अवस्थेत आहेत. मात्र, हवामान प्रतिकूल असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

या अडचणी उद्भवण्याची शक्यता

  • सध्याच्या स्थितीत पोंगा अवस्थेत असणाऱ्या बागा जिरण्याची भीती
  • फुलोरा असणाऱ्या बागांमध्ये गळकुज  
  • बागांच्या छाटण्या येणार नाहीत; मात्र काही ठिकाणी अपरिहार्यता
  • बागांवर डाऊनी, करपा रोगांची दाट शक्यता

प्रतिक्रिया
बदलत्या हवामानामुळे नवीन छाटलेल्या बागांमध्ये नवीन तयार होणाऱ्या घडांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ होत आहे.
-बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता.चांदवड

पाऊस झाल्यास छाटण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मात्र पर्याय नसल्याने छाटण्या कराव्या लागतील. पांढऱ्या वाणात कमी मात्र रंगीत वाणात घड जिरण्याचे प्रमाण वाढू शकते.
- रवींद्र बोराडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,
नाशिक विभाग


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...